तरुण भारत

सोलापूर : विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब : दुकाने बंद, घबराटीचे वातावरण

पंढरपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती प्रशासनास मिळाली. यानंतर तात्काळ संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांनी ताबा घेतला. व मंदिर परिसरातील दुकाने बंद केली. त्यामुळे सर्वत्र निरव शांतता आणि घबराट पसरली गेली.

बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा मंदिर परिसरात आला. सर्व दुकाने तात्काळ पोलिसांनी बंद करून घेतली. तातडीने बॉम्बशोधक पथक अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका ही दाखल झाली. भाविकांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलवले. संशयित वस्तूंची बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. श्वान पथकानेही संपूर्ण परिसर पिंजून काढला. सरते शेवटी बॉम्ब नसल्याची खात्री पोलिसांना झाली. आणि भाविकांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

काही काळानंतर पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बॉम्ब शोध मोहिमेचे मॉकड्रिल करण्यात आल्याची माहिती उघड झाली. आणि मंदिर परिसरातील नागरिक, भाविक यांचा काळजीने चढलेला पारा उतरला गेला. टाळेबंदीनंतर पुन्हा मंदिर सुरू झाले. अशात भाविकांची पंढरपुरात गर्दी होत आहे. प्रसंगी कुठलाही आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रसंगी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास सर्वांना झाला. संबंधित मॉकड्रिल हे पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि किरण अवचर यांच्या माध्यमातून घडले. याप्रसंगी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड देखील उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सातारा : शासकीय अधिकारीचं होणार प्रशासक

Abhijeet Shinde

”शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता”

Abhijeet Shinde

सिव्हिलच्या कोव्हिड सेंटरमध्ये पाण्याचा ठणाणा

Patil_p

यंदाही शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा ऑनलाईन पध्दतीने

Patil_p

रिपाइं नेते शरद गायकवाड यांचे निधन

Patil_p

सोलापूर : कोविड केअर सेंटरमधून १५ कोरोनाबाधितांनी केले पलायन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!