तरुण भारत

वेंगुर्ले रोटरी क्लबच्या मोफत डायबेटीस तपासणी शिबिराचा 50 जणांनी घेतला लाभ

वेंगुर्ले / वार्ताहर:


रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी वेंगुर्ले बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या डायबेटिक तपासणीत आगारातील अधिकारी व कर्मचारी अशा 50 जणांनी लाभ घेतला. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिटवून रोटरी क्लब ऑफ टाऊन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले बस स्थानक येथे रोटरी व रोट्रॅक्ट क्लबच्या इमेज उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांची डायबेटीक तपासणी या उपक्रमाचा शुभारंभ गव्हर्नर यांनी केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रतिमा धोंड, डिस्ट्रिक्ट असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, प्रा. वसंतराव पाटोळे प्रा. आनंद बांदेकर, दादा साळगांवकर, वेंगुर्ले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे, वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्ष सायली निनावे, सदस्य प्रितेश लाड, नितीन कवठणकर, शुभम मुळे, वेंगुर्ला रोटरी क्लबचे अध्यक्ष दुर्गेश पाटील, योगेश साळुंखे, अदिती पवार, सलोनी मजेरीया, श्रुती शेडगे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले बसस्थानकास गाडीवर गाडी कुठून कुठे जाते हे समजण्यासाठी लावण्यास फलकही प्रदान करण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी वेंगुर्ले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी : दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

triratna

सिंधुदुर्गसाठी 25 कोटींची मदत

NIKHIL_N

रत्नागिरी : तवसाळ आगर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान

triratna

इन्सुलीत नऊ लाखाची दारू जप्त

tarunbharat

मालवणात दोन दिवसात 12 जण दाखल

NIKHIL_N

दुचाकींच्या धडकेत तिघे युवक ठार

NIKHIL_N
error: Content is protected !!