तरुण भारत

सांगितल्याशिवाय घर न सोडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव

मुंबई/प्रतिनिधी

Advertisements

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा, बहिणी आणि निकटवर्तीयांच्या घरांवर, कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारे सुरु आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारी केंद्रीय यंत्रणांवर टीका केली आहे. शरद पवारांनी याविषयी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. सांगितल्याशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

अजित पवार यांचा मुलगा, बहिणी आणि निकटवर्तीयांच्या घरांवर, कार्यालयांवर छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या पथकाला पुढचे आदेश येईपर्यंत घर न सोडण्यास बजावण्यात आल्याचा दावा शरद पवारांनी यावेळी केला. “तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि तिसरी गृहिणी आहे. ते तिथे गेले. ठीक आहे काही चौकशी करायची होती ती केली. एक-दीड दिवसाची चौकशी संपली. ते बिचारे काम संपल्यानंतर त्यांना जायची घाई होती. पण त्यांना सारखे फोन येत होते की थांबा, इतक्यात सोडू नका. नंतर त्यांना आमच्या मुलींनीच विचारलं की तुमचे घरचे वाट बघत असतील. तेव्हा ते म्हणाले की आम्हाला निर्देश आहेत की सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे ५ दिवस झाल्यानंतर देखील काही ठिकाणी अजून पाहुणे आहेत. आत्तापर्यंत अशा चौकशा झाल्या आहेत. पण ५-६ दिवस एखाद्याच्या घरात जाऊन चौकशी केल्याचं ऐकिवात नाही. योग्यवेळी त्याबाबत विचार करता येईल. कोल्हापूरला मुलीकडे मी चौकशी केली. तिथे काही जास्त लोक घरी राहात नव्हते. त्यांच्याकडे नवरा-बायको राहतात. त्यांच्या घरी १८ लोकं गेले. जे कधी पाहिलं नव्हतं, ते घडलेलं आहे”, असं पवारांनी यावेळी नमूद केलं.

शरद पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरील आयकरच्या छापेमारीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी उत्तर देताना आयकर विभागाच्या कारवाईचा चांगलाच समाचार घेतला. “अजित पवारांचं स्टेटमेंट मी वाचलं. ते असं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. त्याची रिकव्हरी करण्यासाठी किंवा कुणी कर दिले नसतील तर त्यासाठी काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही ही माझीही अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. पण वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी बोलेन. पण या यंत्रणेची चौकशी थांबल्यानंतर बोलेन. ती चौकशी अजून सुरू आहे,” असं शरद पवार म्हणाले.

Related Stories

सदाशिवगडाच्या विकासास खोडा घालू नये

Patil_p

सातारा : सायगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, शेतीचे प्रचंड नुकसान

triratna

कोल्हापूर जिल्हय़ात ६४ रुग्णांची वाढ

triratna

कोविडबाबत तुमचं उत्तरदायित्व काय?

Patil_p

धक्कादायक : कुलर सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने रुग्णांचा मृत्यू

Rohan_P

कोल्हापूर : संस्थात्मक विलिगिकरणासाठी गेलेल्या कुटुंबास रिसॉर्ट मालकाने केली शिवीगाळ

triratna
error: Content is protected !!