तरुण भारत

“मला कळेना भाजपानं ‘हे’ काँट्रॅक्ट कधी घेतलं ?” – शरद पवार

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

गेले काही दिवस राज्यातील तपास यंत्रणाच्या कारवाईमुळे तपास यंत्रणा चर्चेत आल्या आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुऴे महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. व केली जाणारी कारवाई ही जाणीवपुर्वक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. याचाच भाग म्हणुन शरद पवार यांनी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत “मला कळेना भाजपानं ‘हे’ काँट्रॅक्ट कधी घेतलं ?” असा ही सणसणीत टोला भाजपला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगऴ्या विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गायब आहेत. आणि त्यांचा ठीकाणा अजून लागलेला नाही, असं म्हणत पवार यांनी यावेळी भाजपने सोयिस्कररित्या ठराविक मुद्यांकडे दुर्लक्ष केले असुन भाजप आपली भुमिका बदलत आहे. अशा आशयाचे वक्तव्य केले. तसेच सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. या सगळ्या एजन्सींचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचं चित्र दिसत असल्याचे सांगत भाजपच्या वर्मी घाव घातला आहे. तसेच पाच वेळा एखाद्याच्या घरी जाणं हे कितपत योग्य आहे. याविषयीचा विचार करण्याची वेळ आली आहे. यावर जनमत व्यक्त होण्याची गरज आहे. असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे भाजप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसुन यावर भाजप नेमकी काय भुमिका मांडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

खालावलेल्या अर्थव्यवस्थेतही मोठी विदेशी गुंतवणूक

Patil_p

साखळय़ा तोडण्याचे आव्हान

Patil_p

कोरोनाला हरविण्यासाठी योगा गरजेचा

datta jadhav

कोल्हापूर : ग्रामपंचायत प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नेमणूक करा

triratna

भारतात 70 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

जिल्हय़ात कोरोनामुक्ती 57 हजारांच्या पार

Patil_p
error: Content is protected !!