तरुण भारत

अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

प्रतिनिधी / कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवातील बुधवारी सातव्या माळेदिवशी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटकातील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. आई अंबाबाईच्या नावाचा जयघोष करीत दर्शनरांगेसह मुखदर्शन भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी देवीची पानाच्या विडÎातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. जागरानिमित्त खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांनी तुळजा भवानी आणि अंबाबाईचे दर्शन घेतले.

Advertisements

शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी अंबाबाईसह सर्वच देवदेवतांचा जागर घालण्यात आला. जागरानिमित्त अंबाबाईची पूजा महिषाशूरमर्दीनीच्या रूपात तर तुळजाभवानीची पानाच्या विडÎातील पूजा बांधण्यात आली होती. जागराला अतिशय महत्त्व असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भवानी मंडप, महाव्दार रोड, जोतिबा रोडवर गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळÎापासून दर्शन रांगेत भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. ऑनलाईन बुकींग न केलेल्या हजारो भाविकांनी मुखदर्शन घेऊन आरोग्यदायी जीवन आणि सुखसमृध्दी मिळू दे अशी अंबाबाई चरणी मोठÎा भक्तीभावाने विनवनी केली. तुळजाभवानी आणि अंबाबाईच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. नगरप्रदक्षिणा महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड यामार्गे जाणार असल्याने गुजरी कॉर्नरचा उड्डाणपूल काढण्यात आला. तसेच ज्या मार्गाने नगरप्रदक्षिणा जाणार आहे, त्या मार्गावरील बॅरीकेटस रात्री उशिरा काढून पुन्हा पहाटे बसवण्यात आले. नवरात्रोत्सव काळात घटस्थापना आणि अष्टमी असे दोन दिवस काही भाविक उपवास करतात. बुधवारी अष्टमी असल्याने बहुतांश भाविकांनी उपवास केला होता. सलग सातव्या दिवशीही मोफत मेडीकल कँप मंदिर परिसरात लावलेला होता.

तिरूपती बालाजी देवस्थानचा शालू आज स्वीकारणार

तिरूपती बालाजी देवस्थानच्या वतीने करवीरनिवासिनी आई अंबाबाईला दरवर्षी शालू अर्पण केला जातो. यंदाही तिरुपती देवस्थानच्या वतीने मानाचा शालू बुधवारी रात्री उशिरा आला. हा मानाचा शालू गुरूवार (दि. 14) रोजी सकाळी देवीचा होम झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे स्वीकारणार आहेत.

तुळजाभवानी देवीची पानाच्या विडÎातील अलंकारिक पूजा

शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीची पानाच्या विडÎातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा राजोपाध्ये बाळकृष्ण दादरणे, अमर झुगर, विजय बनकर, आदिनाथ चिखलकर यांनी बांधली होती.

अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा

शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीनिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा अरूण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सकुल मुनीश्वर, विद्याधर मुनीश्वर यांनी बांधली होती.

तुळजा भवानीची नगरप्रदक्षिणा

तुळजा भवानी मंदिराच्या वतीने बुधवारी अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या पालखीत तुळजा भवानीच्या पादुका विराजमान करुन प्रत्यक्ष नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. नगरप्रदक्षिणा मार्गातील फिरंगाई मंदिर, महाकाली मंदिर, अनुगामिनी मंदिर, उत्तरेश्वर महादेव मंदिर आणि खाटीक चौक परिसरातील गजलक्ष्मी मंदिरातील देवदेवतांना मानाचा विडा अर्पण करून धार्मिक विधी करण्यात आले. ही नगरप्रदिक्षणा तब्बल सात तास सुरु होती.

Related Stories

यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे 22 जानेवारीला अनावरण

triratna

कोल्हापूर विभागातील सव्वालाख विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होणार

triratna

राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार

triratna

दोन उपशिक्षणाधिकाऱयांना पदोन्नती

Patil_p

बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडितेकडून आरोपीला खंडणीची मागणी

triratna

कोल्हापूर : दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

triratna
error: Content is protected !!