तरुण भारत

मिरजेत घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

डोक्यात पार घालून केला खून, मुलगा फरारी

प्रतिनिधी/मिरज

Advertisements

शहरातील कृपामाईच्या मागील बाजूस असणाऱ्या बायपास रस्त्यावर गोखले प्लॉट येथे घरगुती वादातून मुलाने वडिलांचा डोक्यात पार घालून खुन केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. किसन जोतिराम माने (वय 55) असे मयत वडिलांचे नाव आहे. तर खून करणारा त्यांचा मुलगा विजय किसन माने (वय 33 रा.बायपास रस्ता, होमगार्ड प्रशिक्षण केंद्र जवळ, मिरज) हा फरार झाला आहे.

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता वडील किसन माने आणि मुलगा विजय माने यांच्यात किरकोळ वाद झाला. त्या वादातूनच त्याने वडिलांच्या डोक्यात पारेचे दोन घाव घातले. वर्मी घाव लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महात्मा गांधी चौक सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस, यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

 

Related Stories

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Rohan_P

“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; मनिष तिवारींचा सिद्धूवर घणाघात

triratna

Pandharpur By Election Result 2021 Updates: आवताडेंची आघाडी कायम

triratna

वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहिम

triratna

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं अमित शहा यांच्या भेटीमागचं कारण

triratna

लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने करावा: शिवकुमार

triratna
error: Content is protected !!