तरुण भारत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

सांगली/प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील कोट्यवधींचे व्यवहार असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांचे उमेदवार रिंगणात असतील. भाजपाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे. पालकमंत्री जयंत पाटील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. 21 नोव्हेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे.

Advertisements

Related Stories

बायडेन यांनी टोचून घेतली फायझरची लस; TV वर केले लाईव्ह प्रक्षेपण

datta jadhav

इंदोरमध्ये मागील चोवीस तासात 61 नवे रुग्ण, एकूण संख्या 2299, तर 98 मृत्यू

Rohan_P

अंबरनाथ : एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

Rohan_P

राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पत्र; म्हणाले…

Rohan_P

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला अटक

triratna

रसुलवाडी येथे विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!