तरुण भारत

आजारांना हुंगणारे ‘नाक’

तपासणीची नवी पद्धत ई-नाक, इलेक्ट्रॉनिक नाकाने समजणार यकृत, फुफ्फुसाचे आजार

आजारांचे निदान करण्यासाठी वेज्ञानिक नव्या प्रकारच्या तपासण्यांना विकसित करू पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक नाक याचेच एक उदाहरण आहे. इलेक्ट्रॉनिक नाकाद्वारे यकृत, फुफ्फुस आणि कोलोन कॅन्सर यासारख्या आजारांचा शोध लावला जाऊ शकतो. आजारांची तपासणी करण्यासाठी या नाकाला स्वतःच्या नाकावर मास्कप्रमाणे लावावे लागेल आणि काही वेळातच आजाराचा शोध लागतो.

Advertisements

इलेक्ट्रॉनिक नोजच्या मदतीने कोरोना संक्रमणाचा शोध लावण्यावरही काम केले जात असल्याचे आउलस्टोल मेडिकल या युकेतील बायोटेक कंपनीने म्हटले आहे. संशोधनानुसार सर्वसाधारणपणे रुग्ण रक्त, यूरिन आणि मलाचा नमुना देताना गोंधळतो, पण नवी तपासणी पद्धत रुग्णांसाठी अत्यंत सोपी ठरणार आहे तसेच वेळही कमी लागणार आहे.

ई-नाकाचे कार्यस्वरुप

हे ई-नाक रुग्णाच्या श्वसनातून येणाऱया आजारांच्या गंधाला शोधून रोगाचा थांगपत्ता लावते. माणूस जेव्हा श्वास सोडतो तेव्हा त्यात 3500 हून अधिक व्होलाटाइल ऑर्गेनिक कम्पाउंड्स असतात यात वायूचे अत्यंत छोटे कण आणि मायक्रोस्कोपिक ड्रॉपलेट्स असतात. ई-नाक व्होलाटाइल ऑर्गेनिक कम्पाउंड्समध्ये असलेल्या रसायनांची तपासणी करते आणि आजारांचा शोध लावते.

उपकरणासाठी लागली 51 वर्षे

हे उपकरण तयार करण्याची कल्पना वैज्ञानिकाला 1970 मध्ये सुचली होती. पण या कल्पनेला संवेदनशील उपकरणात बदलण्यात, व्होलाटाइल ऑर्गेनिक कम्पाउंड्सची ओळख पटविण्याचे प्रोग्रामिंग आणि सेंसर तयार करण्यास कित्येक दशके लागली आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये याचे परीक्षण सुरू आहे. विशेषकरून युकेमध्ये समोर आलेले निष्कर्ष प्रभावी राहिले आहेत. पुढील 5 वर्षांमध्ये ई-नोजद्वारे होणारी चाचणी सामान्य स्वरुपात वापरली जाणारी चाचणी ठरेल. यावर सातत्याने काम केले जातेय. आजाराच्या हिशेबाने रुग्णासाठी कुठले औषध प्रभावी ठरेल हे उपकरणाला सांगता यावे असाही प्रयत्न सुरू आहे.

कर्करोगाचे निदान

या तंत्रज्ञानाद्वारे अनेक देशांमध्ये श्वसनाशी संबंधित वैद्यकीय परीक्षण सुरू आहे. यात कर्करोगाशी संबंधित परीक्षणही सामील आहे. कर्करोगाचे वेळीच निदान करता यावे हे या परीक्षणाचे उद्दिष्ट आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठ आणि एनएचएस फौंडेशनसोबत मिळून युकेतील रुग्णालयांमध्ये 5 हजार रुग्णांवर परीक्षण केले जातेय.

Related Stories

पूर्व लडाखमधून परतले 90 टक्के चिनी सैन्य

datta jadhav

वैज्ञानिकांनी शोधला अनोखा पक्षी

Patil_p

जागतिक ‘एनजीओ’ दिवस का साजरा होतो

Amit Kulkarni

अमेरिका : प्रतिदिन 70 हजार नवे रुग्ण

Patil_p

तहव्वूरच्या प्रत्यार्पणाला बायडेन प्रशासन अनुकूल

Patil_p

भूतानमध्ये चीनची घुसखोरी

Patil_p
error: Content is protected !!