तरुण भारत

गायक रॉबिनवर एमिलीचे गंभीर आरोप

मॉडेल आणि अभिनेत्री एमिली रतजकोव्स्कीने 2013 मधील म्युझिक व्हिडिओ ‘ब्लर्ड लाइन्स’च्या सेटवर गायक  रॉबिन थिकने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते असा दावा केला आहे. तिने गायकावर लैंगिक शोषणाचाही आरोप केला आहे. एमिलीने स्वतःचे पुस्तक ‘माय बॉडी’मध्ये या घटनेबद्दलचा तपशील मांडला आहे.

रॉबिनने एमिलीसोबत केलेल्या या गैरवर्तनाची पुष्टी दिग्दर्शक डाएन मार्टलने एका संभाषणादरम्यान दिली होती. ब्लर्ड लाइन्स हा म्युझिक व्हिडिओ महिलांच्या समुहासोबत चित्रित करण्यात आला होता.

Advertisements

या घटनेपूर्वी थिक मद्याच्या नशेत होता. या घटनेनंतर मला अपमानित वाटले होते. मी याप्रकरणी योग्यप्रकारे प्रतिक्रिया दिली नसल्याची खंत असल्याचे एमिलीने पुस्तकात नमूद केले आहे. या घटनेनंतर दिग्दर्शक मार्टेलने चित्रिकरण संपविण्याचा निर्णय घेतला होता. पण एमिलीने चित्रिकरण पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. एमिलीने पहिल्यांदाच या घटनेबद्दल जाहीर टिप्पणी केली आहे.

Related Stories

अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्यचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन

Rohan_P

हत्येचे गूढ उकलणार मनोज वाजपेयी

Patil_p

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर!

Rohan_P

कंगनाच्या ‘तेजस’च्या चित्रिकरणाला प्रारंभ

Patil_p

अभिनेता प्रणव पिंपळकरचा वैमानिक ते अभिनेता प्रवास सुरु

Patil_p

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा; वाढदिवशी पोस्ट केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

triratna
error: Content is protected !!