तरुण भारत

हुतात्मा शांतिसैनिकांच्या स्मारकाला सैन्यप्रमुखांची भेट

वृत्तसंस्था/ कोलंबो

भारतीय सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे श्रीलंकेच्या 4 दिवसीय दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान त्यांनी भारतीय शांती सैन्य युद्ध स्मारकाला भेट दिली आहे. युद्धस्मारकाच्या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करत सैन्यप्रमुखांनी श्रीलंकेतील शांती मोहिमेदरम्यान सर्वोच्च बलिदान करणाऱया शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. नरवणे यांनी या दौऱयात श्रीलंकन सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे.

Advertisements

भारतीय सैन्यप्रमुख या दौऱयादरम्यान द्विपक्षीय सैन्य संबंध बळकट करण्यासह क्षेत्रीय सुरक्षेच्या आव्हानांबद्दल श्रीलंकेचे नेतृत्व आणि वरिष्ठ सैन्याधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत. बेटसदृश देशात प्रभाव वाढविण्याच्या चीनच्या प्रयत्नांदरम्यान जनरल नरवणे यांचा श्रीलंकेचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

श्रीलंकन सैन्याचे प्रमुख जनरल शावेंद्र सिल्वा यांनी नरवणे यांना आमंत्रित केले होते. जनरल नरवणे यांचा दौरा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सैन्य सहकार्य वृद्धिंगत करणारा असल्याचे कोलंबोतील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. जनरल नरवणे हे श्रीलंकचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे तसेच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊ शकतात.

भारतीय सैन्यप्रमुख नरवणे यांना बुधवारी श्रीलंकेच्या सैन्य मुख्यालयात विशेष मानवंदना देण्यात आली. जनरल नरवणे हे मादुरु ओया स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कुलमध्ये सुरू असलेला द्विपक्षीय सैन्याभ्यास ‘मित्र शक्ती’च्या अंतिम सत्राचे साक्षीदार ठरणार आहेत. 12 दिवसांपर्यंत चालणाऱया या द्विपक्षीय सैन्याभ्यासाचे आठवे आयोजन 4 ऑक्टोबर रोजी सुरू झाले होते.  दोन्ही देशांदरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त सहकार्य विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे.

Related Stories

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगात

datta jadhav

नेपाळच्या विदेशमंत्रिपदी नारायण खडका

Patil_p

चीनविरोधात 27 देशांकडून तक्रार याचिका दाखल

datta jadhav

सादत रहमानला ‘जागतिक शांतता पुरस्कार’ जाहीर

datta jadhav

चीनकडून अनेक देशांच्या नागरिकांवर प्रवेशबंदी

Patil_p

पाण्यात तरंगता पेरूचा बाजार

Patil_p
error: Content is protected !!