तरुण भारत

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू

वृत्तसंस्था/ इम्फाळ

Advertisements

कुकी उग्रवाद्यांनी मंगळवारी कांगपोकपी येथील बी गमनोम गावात जमावावर गोळीबार केला आहे. सुरक्षा दलांकडून चकमकीत मारले गेलेल्या दोन उग्रवाद्यांना अंत्यसंस्कार होत असताना जमा झालेल्या लोकांवर कुकी उग्रवाद्यांनी हल्ला केला आहे. या गोळीबाराच्या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. उग्रवाद्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक लुनसिह किपगन यांनी दिली आहे.

गोळीबारात जखमी झालेल्या एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारानंतर गावातील लोक सुरक्षित ठिकाणी लपून बसले आहेत. तर सुरक्षा दलांनी व्यापक स्तरावर शोधमोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे.

दोन दिवसांपूर्वी मणिपूरच्या हिंगोरानीमध्ये सुरक्षा दलांनी 4 उग्रवाद्यांना कंठस्नान घातले होते. आसाम रायफल्स आणि सैन्याच्या एका संयुक्त मोहिमेत हे यश मिळाले होते. मागील महिन्यात एनआयएने कुकी उग्रवादी समूह युकेएलएफच्या स्वयंघोषित अध्यक्षाला शस्त्रास्त्रांची तस्करी आणि देशाविरोधात कारवाया केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. युकेएलएफचा स्वयंघोषित अध्यक्ष लुंखोसन हाओकिप यापूर्वी फरार होता.

तर मणिपूर पोलिसांनी प्रतिबंधित उग्रवादी संघटना पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कंगलीपाक-प्रोगेसिव्हच्या एका सदस्याला पश्चिम इम्फाळ जिल्हय़ातून अटक केली होती. त्याच्याकडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली होती.

Related Stories

अर्जुनाच्या बाणांमध्ये आण्विकशक्ती!

Patil_p

भोपाळ महानगरपालिका उत्तरप्रदेशातून करतेय डिझेलची खरेदी

datta jadhav

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Patil_p

तामिळनाडू सरकारमध्ये रघुराम राजन यांना जबाबदारी

Patil_p

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांना कोरोनाची लागण

Rohan_P

राज्यात एकाच दिवशी 16 पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!