तरुण भारत

चीनमध्ये पुढील वर्षापर्यंत राहणार वीजसंकट

कोळशाच्या किमतींनी वाढविले जिनपिंग यांचे टेन्शन

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisements

कोळशाच्या तुटवडय़ाला तोंड देणाऱया चीनमध्ये वीज संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. विक्रमी खरेदीनंतरही चीनमध्ये कोळशाची किंमत यंदा तीनपट अधिक वाढली आहे. सप्टेंबरमध्ये चीनच्या एकूण कोळसा आयातीत 76 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तरीही चीनच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना पुरेशा प्रमाणात कोळसा मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याची शेखी मिरविणाऱया चीनला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

चीनमध्ये एक टन कोळशाची किंमत 1,640 युआन (19,172 रुपये) पर्यंत पोहोचली आहे. चिनी वीज कंपन्या कोळशाच्या किमतीतील उतारचढाव आणि बाजारातील मागणीनुसार विजेचे दर आता निश्चित करणार आहेत. याचा सर्वाधिक फटका चीनच्या सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

पुराने बिघडविले गणित

चीनचा प्रमुख कोळसा उत्पादक प्रांत शांक्सीमध्ये पूर आल्याने वीज प्रकल्पांना होणारा पुरवठा बाधित झाला आहे. अशा स्थितीत विजेचा तुटवडा आणि भारनियमन पुढील वर्षापर्यंत सुरू राहू शकते. जगातील सर्वात मोठा कोळशाचा ग्राहक असलेला चीन इंधनाची कमतरता आणि उच्चांकी दरांमुळे वाढत्या ऊर्जा संकटाला सामोरा जातोय.

वीज कंपन्यांना मनमानी सूट

चीनच्या सरकारने कोळसा उत्पादनाला चालना देणे आणि औद्योगिक प्रकल्पांमधील विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे वीज उत्पादक आणि अन्य कोळसा वापरकर्ते विदेशांमधून कोळशाच्या आयातीत तेजी आणत आहेत. चिनी सरकारने औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना वीजदर वाढविण्यास अनुमती दिली आहे.

कोळशाची आयात वाढी

मागील महिन्यात कोळशाची आयात चालू वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण 32.88 दशलक्ष टन कोळशाची आयात झाली. चीनमधील शांक्सी आणि इनर मंगोलिया या प्रांतांमध्ये कोळशाचे उत्पादन वाढविण्याचा आदेश दिला आहे. पुरामुळे 48 लाख टन वार्षिक कोळसा उत्पादन क्षमता असलेल्या चार खाणी बंद राहिल्या आहेत.

Related Stories

नववर्ष जल्लोषावर निर्बंध

Patil_p

जगभरात कोरोनाचे 16 लाख बळी

datta jadhav

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हॅकर्सच्या निशाण्यावर

datta jadhav

‘अलिबाबा’ला दणका; ठोठावला तब्बल 18.2 अब्ज युआनचा दंड

datta jadhav

अशरफ गनी, अमरुल्ला सालेह यांनाही ‘माफी’

Patil_p

कोलंबियात बाधितांनी ओलांडला 20 लाखांचा आकडा

datta jadhav
error: Content is protected !!