तरुण भारत

आता ट्विटरची सेवा डाऊन?

बुधवारी लॉगिनमध्ये जाणवल्या समस्या

नवी दिल्ली 

Advertisements

मागच्या आठवडय़ात फेसबुकची सेवा चांगलीच विस्कळीत झालेली घटना ताजी असतानाच आता ट्विटरची सेवा डाऊन झाल्याची घटना बुधवारी समोर आली.

 बुधवारी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्याचे समोर आले आहे. काही वेबसाईट आणि सर्व्हिसेसच्या रियलटाईमची माहिती देणारा प्लॅटफॉर्म डाऊन डिटेक्टरच्या आधारे देशातील 450 पेक्षा अधिक ग्राहकांचे ट्विटर खात्यांमध्ये समस्या निर्माण झाल्याची माहिती आहे. यामध्ये 55 टक्के लोकांच्या ट्विटरच्या वेबसाईटवर 35 टक्के लोकांचे तर ट्विटर ऍपवर आणि 11 टक्के सर्व्हरशी संबंधीत एरर आल्याची माहिती आहे.

ट्विटरची सेवा डाऊन होण्यामागे काय कारण असणार या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नसल्याचे समजते. एक दिवसअगोदर म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी ही समस्या जीमेलवर आली होती. मागील आठवडय़ात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर दोन वेळा या प्रकारची समस्या निर्माण झाली असल्याची माहिती आहे.

Related Stories

अर्थव्यवस्था वेगाने येतेय पूर्वपदावरः शक्तीकांत दास

Patil_p

एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

क्राफ्टस्मन ऑटोमेशनच्या आयपीओला प्रतिसाद

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूच्या कार्स महागणार

Patil_p

एअर इंडिया विक्रीच्या निविदा सादरीकरणास मुदत वाढ

tarunbharat

देशातील तेल आणि गॅस उत्पादनात ओएनजीसीची हिस्सेदारी वाढली

Patil_p
error: Content is protected !!