तरुण भारत

‘टीपीजी’ टाटा मोर्ट्समध्ये 7,500 कोटींची गुंतवणूक करणार

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत गुंतवणूक- लवकरच व्यवहार पूर्ण होणार

मुंबई 

Advertisements

 टाटा समूहाची कंपनी टाटा मोर्ट्सच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीमध्ये टीपीजी राइज 7,500 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. टाटा मोर्ट्स इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी वेगळी कंपनी बनवत आहे. याकरीता या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

टाटा समभागाचे भाव उच्चांकावर

टाटा मोर्ट्सचे समभाग एक वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले होते. यामध्ये दुपारपर्यंत भाव 420 रुपयावर बंद झाला आहे. सोमवारी यामध्ये 8 टक्के तेजी राहिली होती. एक महिन्याअगोदर समभागाचा भाव 293 रुपये होता. जो सध्या 40 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढलाय. तीन दिवसात समभाग 24 टक्क्यांनी मजबूत राहिला होता.

स्टॉक एक्सचेंजला दिली माहिती

टाटा मोर्ट्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या बोर्डाने टीपीजी राइजच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. टाटा मोर्ट्स इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवी कंपनी बनवित आहे. कंपनी भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहे. टाटा कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत टेस्लासह अन्य कंपन्यांना टक्कर देणार आहे.

टीपीजी राइजची हिस्सेदारी

समभागाच्या आधारे टीपीजी राइज 11 ते 15 टक्के हिस्सा घेणार आहे. यामध्ये नव्या कंपनीचे इक्विटी मूल्य 9.1 अब्ज डॉलर राहणार आहे. टीपीजी ही रक्कम येत्या 18 महिन्यांमध्ये टाटा इलेक्ट्रिकल वाहन कंपनीत गुंतवणार आहे.

टाटा मोर्ट्सची मजबूत कामगिरी

देशासह जगभरातील सर्व कंपन्या चिपच्या कमतरतेमुळे समस्यांचा सामना करत आहेत. यामुळे काही प्रमाणात उत्पादन प्रभावीत होत आहे. परंतु या सर्व कालावधीतही टाटा मोर्ट्सच्या विक्रीच्या आकडेवारीने मात्र सर्वांची झोप उडवून टाकली आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जागतिक विक्रीत 24 टक्क्यांची मजबूत तेजी प्राप्त केली आहे.

टाटा मोर्ट्सची विक्री वधारण्यात कार आणि व्यावसायिक वाहनं यांची प्रमुख कामगिरी राहिली आहे. तिमाही दरम्यान 2,51,689 वाहनांची विक्री केली होती. प्रवासी वाहनांची विक्री ही 1,62,634 इतकी करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. टाटा मोर्ट्सकडून प्रत्येक महिन्याला भारतामधील विक्रीचे आकडे सादर करण्यात येतात.

Related Stories

‘एल ऍण्ड टी’ला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

टॉप 5 कंपन्यांमध्ये बायोकॉनचा समावेश

Patil_p

जेफ बेजोसच्या संपत्तीत वाढ

Patil_p

ब्रिटानिया इंडस्ट्रिज उतरवणार विमा

Patil_p

दुचाकी पुन्हा महागणार

Patil_p

कोरोना लढाईसाठी विप्रो देणार 1000 कोटी

Patil_p
error: Content is protected !!