तरुण भारत

सेन्सेक्स-निफ्टी वधारत नव्या उंचीवर

सलग पाचव्या सत्रात तेजी  – महिंद्रा ऍण्ड महिंद्रा मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय भांडवली बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले असून सलग पाचव्या सत्रात बुधवारी शेअर बाजारात मजबूत स्थिती राहिली आहे. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 453 अंकांनी वधारत नव्या उंचीवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने निर्देशांकाने मजबूत कामगिरी नोंदवली. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्सने एकावेळी 60,836.63 चा टप्पा प्राप्त केला होता. अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 452.74 अंकांनी वधारुन 0.75 टक्क्यांच्या मजबूतीसह निर्देशांक 60,737.05 वर विक्रम नोंदवत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 169.80 अंकांनी वधारत 0.94 टक्क्यांसोबत निर्देशांक 18,161.75 वर बंद झाला आहे. तर निफ्टीने 18,197.80 पर्यंत एकावेळी मजल मारली होती.

दिग्गज कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग पाच टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबत आयटीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, टायटन आणि टाटा स्टीलचे प्रमुख समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. देशातील बाजारात तेजी कायम राहिली असून जागतिक बाजारातील स्तर हा मिळता जुळता राहिल्याने निर्देशांकात सेन्सेक्स व निफ्टी हे नवीन विक्रम नोंदवत बंद झाले आहेत.

प्रमुख क्षेत्राची कामगिरी

भारतीय बाजारात प्रामुख्याने आर्थिक कंपन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या कामगिरीमुळे बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. टाटा मोर्ट्सवर गुंतवणूकदारांची नजर राहिली आहे.

आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय आणि सियोल लाभात राहिले आहेत. तर टोकिओ घसरणीत राहिला आहे.

Related Stories

एप्रिलमध्ये विविध कंपन्यांनी रेटिंगमध्ये नोंदवली घट

Patil_p

ऍक्सिस बँकेकडून कॉन्टॅक्टलेस पेमेन्ट उपकरण

Patil_p

एचसीएलकडून 20 हजार जणांची भरती

Patil_p

6 कंपन्यांची 91 हजार कोटींची भर

Patil_p

इंडियाबुल्सने 874 कोटींची केली घर विक्री

Patil_p

पेटीएमचा वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटीच्या घरात

Omkar B
error: Content is protected !!