तरुण भारत

सातशे रुपयाची लाच स्विकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

करमाळा / प्रतिनिधी 

करमाळा पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाला बुधवारी (ता. १३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या संबंधित पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शशिकांत तुकाराम वाळेकर ( वय ४९, रा. शेलगाव, ता. करमाळा) असे त्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या पत्नीला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस नाईक वाळेकर यांनी यांच्याकडे १० हजारची मागणी केली होती. पहिला पहिला टप्पा म्हणून ७०० रुपये स्वीकारताना वाळेकर याना सापळा रचून पकडले आहे.

तक्रारदार व त्यांची पत्नी, मुलगा याच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात पोलिसाने तक्रारदाराला लाच मागितली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला संपर्क साधला. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारताना पकडले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अॅंटी करपशन ब्यूरोचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, शिरिशकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, अतुल घाडगे, यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisements

Related Stories

कोणत्याही प्रकारचे कर्ज हप्ते वसुली केल्यास कारवाई

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात आज १९ कोरोना रुग्णांची वाढ ; एकूण आकडा ५०५

Abhijeet Shinde

जळगाव : 14 वर्षात 1679 शेतकऱयांच्या आत्महत्या

prashant_c

पालकमंत्र्यांनी सोलापूरकरांच्या नादी लागू नये

Abhijeet Shinde

वाळू चोरणारा ट्रॅक्टर बार्शी ग्रामीण पोलिसांनी पकडला

Abhijeet Shinde

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांत नाराजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!