तरुण भारत

डॉ. मनमोहन सिंग तापामुळे रुग्णालयात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉ. नितिश नायक यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुधवारी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी मागील वर्षीही एका नवीन औषधाच्या रिऍक्शनमुळे ताप आल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 2009 मध्ये एम्समध्ये त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती.

Advertisements

88 वर्षीय मनमोहन सिंग यांना यावषी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. एम्समधील यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मनमोहन सिंग सध्या राज्यसभा सदस्य आहेत. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते.

Related Stories

शफाली, स्नेह राणाला नामांकन

Patil_p

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी पवनकुमार बन्सल

datta jadhav

देशात 12,408 नवे बाधित, 120 मृत्यू

datta jadhav

‘या’ राज्यांमध्ये जानेवारीपासून सुरू होणार शाळा

Rohan_P

देशात 41,100 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

युपीएससी परीक्षार्थींना पुन्हा संधी मिळणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!