तरुण भारत

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सराव सामने

दुबई / वृत्तसंस्था

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत यादरम्यान एकूण 16 सराव सामने खेळवले जाणार आहेत. सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये होतील. यासाठी प्रेक्षकांना  प्रवेश दिला जाणार नाही, असे आयसीसीने जाहीर केले. भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना दि. 18 रोजी तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना दि. 20 ऑक्टोबर रोजी होईल.

Advertisements

भारताविरुद्ध लढत देण्याबरोबरच इंग्लंडचा संघ सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध देखील लढणार आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हे संघही अन्य एका लढतीत आमनेसामने भिडतील. पाकिस्तानचा संघ विंडीज व दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध खेळणार आहे. सराव सामन्यांचा प्रारंभ दि. 12 ऑक्टोबरपासून होणार असल्याचे आयसीसीने यावेळी म्हटले आहे. दि. 20 रोजी सराव सामन्यांची सांगता होईल.

Related Stories

न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

रविंदरची जेतेपदाकडे वाटचाल,

Patil_p

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र सलग दुसऱया वषी विजेते

Patil_p

ब्रिटनचा कॅमेरून नोरी विजेता

Patil_p

इंग्लंडकडून लॉर्ड्सचा हिशेब लीड्सवर चुकता!

Patil_p

ग्रॅण्डमास्टर आनंद संयुक्त सहाव्या स्थानी

Patil_p
error: Content is protected !!