तरुण भारत

युवकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील आरटीओ कार्यालयाच्या चौकातील टपरीवर चहा पित उभा राहिलेल्या युवकावर चाकू व कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यातील दोन युवक साताऱयातील व एक कोंडवे (ता. सातारा) येथील आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवक शुभम विनोद कांबळे (वय 26, रा. बुधवार पेठ, सातारा) हा दि. 11 रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास साताऱयातील आरटीओ चौकातील टपरीवर चहा पित उभा होता. त्यावेळी तिथे अचानकपणे कृष्णा शिंदे (रा. कोंडवे, ता. सातारा), गौरव भिसे उर्फ टेटय़ा व शुभम साठे (दोघे रा. ढोरगल्ली, सातारा) हे तिघेजण आले.

त्यातील कृष्णा शिंदे याने शुभम याच्याजवळ येवून तू माझ्या पप्पांना का बोललास असे म्हणत शिवीगाळ करन हातातील कोयता, दांडके व चाकूने मारहाण केली. तर शुभम साठे याने शुभम कांबळेवर चाकूने पाठीत वार केला तर कृष्णा शिंदे याने कोयत्याने डोक्यात वार केला. मात्र तो शुभम कांबळे याने चुकवल्याने तळहातावर लागून तो जखमी झाला.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर शुभम कांबळे याला उपचारासाठी कराडमधील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्याने दि. 13 रोजी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर तीन युवकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.

Related Stories

पंढरपूरात लक्षणे नसलेल्या 20 कोरोबाधितांवर घरातच उपचार

triratna

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे ब्रीच कँडीत

triratna

जिल्ह्यात २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

triratna

फोन टॅपिंग प्रकरण रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून समन्स

triratna

रॉबिनहूड आर्मी समाजसेवकांकडून परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मदत

triratna

बीडमध्ये मुंडे समर्थकांचे राजीनामे

triratna
error: Content is protected !!