तरुण भारत

जिल्हा बँकेसाठी ‘सहकार’समोर ‘परिवर्तन’चे आव्हान?

प्रतिनिधी/ रत्नािगरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 नोव्हेंबर रोजी होणाऱया निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय सहकार [email protected]®eer Ieesषणा करण्यात आली आहे. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याचा दावा डॉ. चोरगे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र वरिष्ठांनी सांगितल्यास सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला असून भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणे यांनीही ‘सहकार’ने देऊ केलेल्या जागांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान संचालकांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करत  टी. एस. दुडय़े यांनी परिवर्तन [email protected]®³ee ceeOयमातून आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. मच्छीमार व्यावसायिकांच्या प्रतिनिधीत्वावरूनही मतभेद पुढे येऊ लागले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होते, सध्याच्या उमेदवारात काही बदल होतात की बँकेचा निवडणूक आखाडा रंगणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisements

   रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि पॅनलचे प्रमुख ड़ॉ तानाजी चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न असून राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेसबरोबर भाजपही यामध्ये समाविष्ट आहे. सहकारात राजकारण नको यासाठी प्रतिकूल राजकीय परिस्थितीत संपूर्ण राज्यात हा आदर्शवत प्रयोग रत्नागिरी जिह्यात करण्यात आल्याचे ड़ॉ तानाजी चोरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल़े एकूण 21 पैकी राष्ट्रवादी 10, शिवसेना 6, काँग्रेस 3 आणि भाजपला 2 जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये बरेचसे संचालक जुनेच असून मोजक्याच नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. सर्व पक्षांनी ही बाब मान्य केली. कोणत्याही पक्षातील व्यक्ती अपक्ष उभी राहिल्यास त्याला पक्षाचा पाठिंबा राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 असे आहे सहकार पॅनेल

सहकार पॅनेलमध्ये डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव, शेखर निकम, रमेश दळवी, राजेंद्र सुर्वे, जयंत जालगावकर, दिनकर मोहिते, सुरेश कांबळे, रामचंद्र गराटे, दिशा दाभोळकर, सुधीर कालेकर, आदेश आंबोळकर, गणेश लाखण, अनिल जोशी, गजानन पाटील, नेहा माने, संजय रेडीज, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, ऍड. दीपक पटवर्धन, अमजद बोरकर हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत़

  भाजपाला केवळ 2 जागा अमान्य ः नीलेश राणे

भाजपातील अनेकजण सहकार क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असताना अवघ्या 2 जागांवर समाधान का मानले गेल़े हे वाटप कोणाला विचारुन करण्यात आले, हे कळत नाह़ी इच्छुक एकत्र येत उद्या सहकार पॅनेलच्या विरोधात उभे राहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असा सूचक इशारा भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिल़ा

वरिष्ठांनी सांगितल्यास रिंगणात उतरणारः काँग्रेस जिल्हाध्यक्ष लाड

सहकार पॅनेलने कॉग्रेसला 3 जागा दिल्या आहेत़ हा प्रस्ताव आमच्या नेतृत्वाला मान्य असल्यास आम्हांला मान्य असेल़ नेतृत्वाने सर्व जागा लढा, असा आदेश दिल्यास सर्व जागावंर उमेदवार उभे करू. या बाबत आमच्या वरिष्ठांशी चर्चा चालू आह़े

       जिल्हा बँकेची निवडणूक परिवर्तन पॅनल लढवणारः टी. एस. दुडय़े

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असले तरी सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी सर्वांनाच मिळावी म्हणून परिवर्तन पॅनल या निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती टी. एस. दुडय़े यांनी दिली.  जिह्याबाहेरील कारखान्यांना पतपुरवठा न होता जिह्यातील उद्योजकांना पतपुरवठा व्हावा, इथला उद्योजक स्वतःच्या पायावर उभा रहावा. बँकेच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचावा, भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी परिवर्तन पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. सहकार पॅनेलच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढतानाच परिवर्तन पॅनेलने निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.

   मच्छीमार प्रतिनिधींचा मच्छीमारांना फायदा नाहीः गोदड

सहकार पॅनलेचे जाहीर केलेले मच्छीमार प्रतिनिधीं म्हणून जे नाव जाहीर झाले आहे ते कोणी जाहीर केले, हे समजून येत नाह़ी मच्छीमारांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी गेल्या 5 वर्षात मच्छीमारांसाठी काय केल़े मच्छीमारांच्या हितापेक्षा हे प्रतिनिधी आपल्या नावासाठी सर्व खटाटोप करत असल्याचा आरोप मच्छीमार नेते दिलावर गोदड यांनी केल़ा ते म्हणाले की, किसान क्रेडीट कार्ड, नीलक्रांती योजना, पंतप्रधान योजना आदींबाबत जिल्हा संघात गेल्या 5 वर्षात बैठका का झाल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण स्वतः मच्छीमार कर्जाविषयी 5-6 बैठकांना उपस्थित होत़ो मात्र एकाही मच्छीमाराला कर्ज मिळालेले नाह़ी

बॉक्स करणे—–

19 नोव्हेंबरला मतदान, 21 ला मतमोजणी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी प्राधिकरणाने जारी केला आह़े  त्यानुसार 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 21 रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक ड़ॉ सोपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आह़े

  13 ते 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आह़े दररोज सायंकाळी 4 व़ा पर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्रे निवडणूक कार्यालयात जाहीर होणार आहेत़ 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 व़ा नामनिर्देशन पत्रांची छाननी व 26 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिध्द करण्यात येणार आह़े 26 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आह़े 11 नोव्हेंबर रोजी निशाणी वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन हेणार आह़े  19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. 21 नोव्हेंबर रोजी स. 9 पासून मतदान मोजणीनंतर निकाल घोषित होतील.

Related Stories

मेडिकल कॉलेजसाठी तीन जागांची प्राथमिक निवड!

Patil_p

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये हृदयशास्त्र विभाग सेवा

NIKHIL_N

‘निसर्ग’ची 152 कोटी 42 लाख नुकसान भरपाई वितरित

Patil_p

सुरळीत विजेसाठी युवकांची मदत

NIKHIL_N

चिपळुणातील इमारती, वाडय़ा आयसोलेट!

Patil_p

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!