तरुण भारत

चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलसाठी ऑक्सीजन पुरवठा प्रकल्प कार्यान्वीत

प्रतिनिधी /वास्को

चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलचा ऑक्सीजन पुरवठा प्रकल्प सज्ज झाला आहे. बुधवारी संध्याकाळी वाहतुक व पंचायतमंत्री तसेच स्थानिक आमदार माविन गुदिन्हो यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करून तो कार्यान्वीत करण्यात आला. यावेळी मुरगावचे नगरसेवक लियो रॉड्रिक्स, सुदेश भोसले, विनोद किनळेकर, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते वामन चोडणकर, दिगंबर आमोणकर, उपजिल्हा हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर, इतर डॉक्टर्स तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना कोविड काळात ऑक्सीजनच्या कमरतेमुळे समस्या उभी राहिली होती याचा उल्लेख करून अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे ऑक्सीजन प्रकल्पाची आवश्यकता निर्माण झाली होती. अशा वेळी चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व त्यांच्या सेवकांनी चांगले कार्य केले. अनेकांचे जीव वाचवले होते. चिखलीच्या या हॉस्पिटलसाठी ऑक्सीजन प्रकल्प देण्याचे आवश्वासन आपण त्यावेळी दिले होते. आता हा प्रकल्प उपलब्ध झालेला आहे. हा प्रकल्प सेवेसाठी सज्ज झालेला आहे. हा क्षण मुरगाव तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पीएम कॅअर योजनेतून हा प्रकल्प उपलब्ध झालेला असून गोव्यात एकूण पाच ठिकाणी असे ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यात आलेले असल्याची माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

चिखलीच्या या हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑपरेशन थिएटरही कार्यान्वीत होईल. यंत्र सामुग्री जलद उपलब्ध केली जाऊ शकते. परंतु लागणारे डॉक्टर्स, भुलतज्ञ, इतर कर्मचारी वर्ग भरती करण्याची प्रक्रिया वेळ घेणारी आहे. मात्र, ऑपरेशन थिएटर कार्यान्वीत करण्याचे आपले प्रयत्न जारीच आहेत. या हॉस्पिटलच्या आवश्यकता पूर्ण करण्यात येत असून सीएसआरच्या माध्यमातूनही सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

Related Stories

काणकोणात 92 हजारांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p

आपचे मैदानात,अन्य आमदार, लोकप्रतिनिधी गायब

Amit Kulkarni

कुंडई उपसरपंचपदी सर्वेश जल्मी

Amit Kulkarni

साळ गावात यावषीही महापुराचा धोका.

Omkar B

दोन अट्टल गुन्हेगाराना साळगाव येथे अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!