तरुण भारत

तर अमित शहा यांनी गोव्याचा पूर्ण दौरा करावा

खराब रस्त्यांवरुन युवा काँग्रेसचा सरकारवर निषाणा

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गोव्यात कुर्टी फोंडा व धारबांदोडा येथे कार्यक्रम असल्याने या भागातील रस्ते चकाचक झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे रस्त्यांचे भाग्य उजळू शकते, तर त्यांनी आठ दिवस थांबून संपूर्ण गोव्याचा दौरा करावा. गोव्यातील सर्व रस्त्यांची झटपट सुधारणी होईल, अशी मागणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी केली आहे. 

कुर्टी-फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील खराब रस्त्यांवरुन सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. राज्यातील एकही रस्ता सध्या वाहनाचे चालविण्याच्या लायकीचा उरलेला नाही. खराब रस्त्यांमुळे मोठय़ाप्रमाणात अपघात होत असून वाहनांचीही हानी होत आहे. काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरुन खड्डय़ांसोबत सेल्फे काढण्याची मोहीम सुरु केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग आली. कुंकळळी येथील जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा केली. त्यांची ही घोषणा कितपण प्रत्यक्षात येईल हे लवकरच कळेल, असे वरद म्हार्दोळकर म्हणाले.  मागील बराच काळ खराब रस्त्यांमुळे गोमंतकीय जनता खस्ता खात आहे. पण अमित शहा यांच्या गोवा भेटीमुळे चमत्कार घडलेला. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पावळय़ात रस्त्यांवर हॉटमिक्स घालणे शक्य नसल्याचे सांगितले होते. आता तेच रस्ते भर पावसात व एका रात्रीच चकचकीत झाले आहेत. नोव्हेंबरपर्यंत सुरु न होणारा हॉटमिक्स प्रकल्पच पावसाळा संपण्यापूर्वीच सुरु झाला आहे. अमित शहा हे धारबांदोडा येथे राष्ट्रीय न्यायवैदक विद्यापीठाचे भूमिपुजन व कुर्टी येथे संस्थेच्या कँपसचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे दाबोळी विमान तळापासून ते ज्या ज्या भागातून जातील ते रस्ते चकचकीत झाले आहेत. सरकारने हा चमत्कार गोव्यातील इतर रस्त्यांबाबतही करावा, अशी मागणी युवा काँग्रेसने केली आहे.

Related Stories

राज्यात जमीन रुपांतरणाचा सपाटा

Patil_p

ज्याने चूक केली, त्यानेच ती निस्तरावी

Amit Kulkarni

आठ वर्षानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण

Omkar B

पाटणेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दणका

Amit Kulkarni

साहित्य निर्मिती होत राहिल..तोपर्यंत वाचन सांस्कृती टिकेल..!

Patil_p

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची : सरपंच

Omkar B
error: Content is protected !!