तरुण भारत

अमित शहा आज गोव्यात

भाजप आमदारांसह मंत्र्यांसोबत घेणार बैठक

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दि. 14 ऑक्टोबर रोजी गोव्यात येत असून ते भाजप आमदार, मंत्री यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यावेळी निवडणूकपूर्व युती करण्याबाबत चर्चा होणार असून रणनीती आखण्यात येणार आहे. ताळगाव कम्युनिटी हॉलमध्ये सायंकाळी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. तेथे ते मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे गोव्याचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस व गोवा प्रभारी सी. टी. रवी हे देखील गोव्यात पोहोचले असून त्यांची देखील शहांसोबत बैठक होणार आहे.

दोन प्रकल्पांची पायाभरणी

शहा हे सकाळी गोव्यात पोहोचणार असून ते प्रथम धारबांदोडा येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक विद्यापीठाची पायाभरणी करतील. तेथून ते संजीवनी साखर कारखान्यात जाऊन तेथे इथेनॉल प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्याहस्ते होणार आहे. दोन प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहेत. दुपारी पणजीत येऊन भाजप आमदार, मंत्री यांची बैठक घेतील. तेथून ते ताळगाव सेंटरात सभेसाठी जाणार असून नंतर पुन्हा दिल्लीला परतणार आहेत.

युतीसंदर्भात चर्चेची शक्यता

शहा यांच्या गोवा भेटीत फडणवीस व रवी यांनाही भाजपतर्फे पाचारण करण्यात आले असून आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा होणार आहे. भाजप मगो युती करावी की नको यावरही विचारविनिमय होणार असून मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

रस्ता कोणासाठी जनतेसाठी की शहांसाठी ः आप दरम्यान, शहा ज्या रस्त्यावरून जाणार आहेत, तेथील खड्डे बुजवण्याचे व ते रस्ते नव्याने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ताळगाव कम्युनिटी सेंटरबाहेरील रस्ता डांबरीकरण करण्यात आला असून या प्रकरणी ‘आप’ने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जनता रस्ते सारखे करा, अशी मागणी करते तेव्हा ते होत नाहीत, आणि आता शहा येणार म्हणून ते सारखे करतात हे चुकीचे असल्याचे ‘आप’ नेत्या सिसिल रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे. रस्ता कोणासाठी जनतेसाठी की शहांसाठी, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Related Stories

चेन्नईन-केरळ ब्लास्टर्स लढत 1-1 बरोबरीत

Amit Kulkarni

सरकारला अहितकारी निर्णय मागे घेण्याचा आदेश द्यावा

Omkar B

लॉकडाऊन कालावधी 30 पर्यंत वाढणार

Patil_p

दिल्लीचे वीज दर गोव्यातील वीज दरापेक्षा जास्तच

Omkar B

कामगारांचे वेतनाच्या मागणीसाठी काम बंद

Patil_p

काणका मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर 7 दुकाने जमीनदोस्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!