तरुण भारत

सिल्क इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

नवरात्र आणि दसऱयाचे औचित्य साधून हस्तशिल्पी या संस्थेतर्फे सिल्क इंडिया हे मनमोहक अशा साडय़ांचे प्रदर्शन मराठा मंदिर येथे भरले आहे. बुधवारी सकाळी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisements

या प्रदर्शनात देशातील 17 राज्यांमधील विणकरांनी सहभाग घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विणकर घरीच बसून होते. बेळगावमध्ये होत असलेल्या या प्रदर्शनाने त्यांचा उत्साह वाढला असून प्रदर्शनात एकूण 45 स्टॉल्स आहेत. सदर प्रदर्शन वस्त्राsद्योग मंत्रालयाशी सलग्न आहे.

गोव्यानंतर बेळगावला हे प्रदर्शन होत आहे. यानंतर हुबळी आणि पुढे जम्मू या ठिकाणी हे प्रदर्शन होणार आहे. कोणत्या पसिरामध्ये कोणत्या साडय़ांना मागणी आहे याचा विणकरांना अंदाज असतो. त्यामुळे दर प्रदर्शनात विणकर आणि त्यांची उत्पादने बदलत राहतात, असे व्यवस्थापक मंजुनाथ यांनी सांगितले.

या प्रदर्शनात टसर, इरी, मलबरी, मुगा या साडय़ांचे नमुने प्रामुख्याने पहायला मिळतील. बिहार, आसाम, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने टसर आणि मुगा सिल्कचे उत्पादन होते. प्रदर्शनात अरिणी सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, कांजीवरम, धर्मावरम्, ज्युट सिल्क, ढाका सिल्क, हॅन्डलुम सिल्क, पैठणी, गढवाल, मंगलगिरी, पोचमपल्ली अशा साडय़ांचाही समावेश आहे.

या शिवाय प्रिंट साडी, बेड कव्हर्स, डेस मटेरियल, बॉर्डर लाझाज, अपुर्वा सिल्कसाडी, गीचा साडी, बुटीक साडी, कांथा साडी, जरदोसी, लखनौ, भागलपूर, सुटस्, प्रेंटेड सिल्क, बनारसी साडी, रेश्मी प्लेन व बुटी साडी, महेश्वरी, चंदेरी, कोटा, टेम्पल बॉर्डस् व हातमागावर तयार झालेल्या साडय़ा प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

Related Stories

ट्रक-दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p

बुधवारी जिल्हय़ात 57 नवे रुग्ण

Amit Kulkarni

चोऱ्यांच्या सत्राने मारुतीनगर वासीय भयभीत

Rohan_P

खड्डय़ांमध्ये हरवला महाद्वार रोड

Omkar B

चक्रीवादळामुळे झाडशहापूर येथील शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान

Amit Kulkarni

लालबहाद्दुर शास्रीनगर येथील रहिवासी बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!