तरुण भारत

‘दसरोत्सवाची चाहूल, खरेदीसाठी मार्केट फुल्ल’

दसऱयाच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रिज, मोबाईल, सोने, वाहने बुकिंग करण्यासाठी बाजारपेठ गर्दीने फुलली

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

दसऱयाच्या निमित्ताने बेळगावची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली आहे. गुरूवारी खंडेनवमी म्हणजे आयुध पूजेचा दिवस. या पूजेसाठी ऊस व झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. यामुळे ऊस व फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. नवरात्रीमुळे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर दसऱयाच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रिज, मोबाईल, सोने, वाहने बुकिंग करण्यासाठी बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.

गणेशोत्सवानंतर बाजारपेठेत काहीशी मरगळ होती. खरेदीही निम्म्याहून कमी आली होती. परंतु दसरा जवळ येवू लागला आहे. तशी बाजारपेठ पुन्हा एकदा बहरत आहे. दसऱयाच्या खरेदीच्या निमित्ताने बुधवारी गणपत गल्ली, मारूती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ या मुख्य बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. वस्त्र प्रावरणांसोबतच पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

दसऱयाला मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी होते. त्यामुळे सराफी दुकानांमध्ये आतापासूनच बुकींग सुरू झाले आहे. यासोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी, मोबाईल अशा साहित्यांची खरेदी जोरात आहे. खरेदी वाढल्यामुळे व्यापाऱयांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. अनेक दुकानांमध्ये दसऱयासाठी विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

यावषी 40 ते 50 रूपयांना 5 ऊस

खांडेनवमी दिवशी ऊस लावून पूजा केली जाते. आयुध पूजन करताना प्रथम ऊसाची पूजा करावी लागते. यामुळे शहर व उपनगरांमध्ये ठिकठिकाणी ऊसाची विक्री केली जात आहे. यावषी 40 ते 50 रूपयांना 5 ऊस विक्री केले जात आहेत. फुलांचे हार 20 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. झेंडूची माळ एक हात 25 रूपये दराने विक्री केली जात आहे.

Related Stories

पथदीप बसविले, मातीचे ढिगारे जैसे थे

Amit Kulkarni

विस्तापितांसाठी होणार रेशनचे वितरण

Patil_p

स्वतःपेक्षा आम्हाला काळजी उंटांचीच!

Amit Kulkarni

कारवार येथील आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच

Amit Kulkarni

भवानीनगर सोशल क्लबतर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची आज सांगता

Amit Kulkarni
error: Content is protected !!