तरुण भारत

वाढीव जीएसटी कमी करण्याची मागणी

प्रेस ओनर्सतर्फे महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

वाढवलेली जीएसटी कमी करण्यासंदर्भात बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी आणि कमर्शियल टॅक्सिसचे जॉईंट कमिशनर यांना निवेदन देण्यात आले. 12 टक्क्मयांवरून 18 टक्के जीएसटी केल्यामुळे प्रिटिंग व्यावसायिक अडचणीत आले आहेत. तेव्हा तातडीने ही जीएसटी कमी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट कोसळले आहे. जीएसटी वाढीसंदर्भात जो निर्णय घेण्यात आला आहे तो प्रिटिंग व्यावसायिकांना अडचणीचा ठरत आहे. महागाईमुळे व्यवसाय करणे कठीण जात आहे. यातच 12 टक्क्मयांवरून 18 टक्के जीएसटी केल्यामुळे पुन्हा व्यवसायावर परिणाम होणार आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून जीएसटी कमी करावी, अशी मागणी निवेदनात केली आली.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव पेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष बापु जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे, सेपेटरी श्याम मांगले, संतोष होर्तीकर, अशोक धेंड, सतीश जाधव, नंदू देशपांडे, विलास सावगावकर, रघुनाथ राणे, बाळू कदम, राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

Related Stories

खरेदीला उधाण, दक्षतेची गरज

Omkar B

लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे विद्यार्थ्यांना मास्क

Patil_p

कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

अक्कतंगेरहाळ हे गाव ग्रा.पं.मध्येच ठेवा

Patil_p

औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी करा

Patil_p

बेळगावमध्ये औद्योगिक वसाहती सुरळीत सुरू

Patil_p
error: Content is protected !!