तरुण भारत

सरदार्स मैदानावरील गाळय़ांची बोली घसरली

चारपैकी तीन गाळय़ांचा लिलाव : मनपाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा भाडे मिळाले दुप्पट

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सरदार्स मैदानावरील संकुलामधील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मागील लिलावावेळी चढाओढ वाढली होती. त्यामुळे बोलीवेळी भाडय़ाची रक्कम 19 हजार रुपयांपर्यंत पोहचली होती. पण बुधवारी पुन्हा आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेवेळी बोली घसरली असून मनपाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट भाडे मिळाले आहे.

सरदार्स मैदान आणि मनपा कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी मागीलवेळी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी सहा गाळय़ांना बोली लावण्यात आली होती. त्यामुळे सहा गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला वर्षाला दहा लाख रुपये भाडे मिळणार होते. पण गाळे घेतलेल्या नागरिकांनी अनामत रक्कम भरली नसल्याने तीन गाळय़ांचा फेरलिलाव बुधवारी करण्यात आला. सरदार्स मैदानावरील संकुलातील गाळय़ाचे बांधकाम अर्धवट असल्याचे सांगून लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. उर्वरित कामे पूर्ण करून येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

सरदार्स मैदानावरील चारपैकी तीन गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. एक लाख रुपये अनामत रक्कम आणि 5100 रुपये भाडे महापालिकेने निश्चित केले होते. पण तिन गाळय़ांसाठी तब्बल 10 नागरिकांनी बोली प्रकियेत भाग घेतला होता. यावेळी 10 हजार 200 रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. तर दुसरा गाळा 8400 रुपये आणि 6 हजार 600 रुपये किमान बोली लावण्यात आली. त्यामुळे मनपाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त भाडे मिळाले आहे. सदर गाळे 12 वर्षाकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.

 लिलाव प्रक्रियेवेळी मनपा महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, बाबू माळण्णावर, फारुक यड्रावी, महसूल निरीक्षक नंदू बांदीवडेकर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ात 49 नवे रुग्ण तर 46 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

ड्रेनेज तुंबल्याने विहिरींचे पाणी दूषित

Amit Kulkarni

नवी ऊर्जा घेऊन दौडची सांगता

Patil_p

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी रूदेश घाळी यांची नियुक्ती

Amit Kulkarni

उचगाव मराठी साहित्य संमेलन 24 जानेवारीला घेण्याचा निर्णय

Patil_p

पिरनवाडी येथे घरामध्ये पकडला साप

Patil_p
error: Content is protected !!