तरुण भारत

आरटीपीसीआर सक्ती कायम

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : दसऱयानंतर घेणार निर्णय

वार्ताहर /कोगनोळी

Advertisements

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा नदी पुलावर असलेल्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळपासून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱयांनी आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घ्यावी, यासाठी शिफारस केली आहे. याबाबत अद्याप तपास नाका प्रशासनाला आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आंतरराज्य वाहतूक करणाऱयांना आरटीपीसीआरशिवाय प्रवेश नसणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आरटीपीसीआर सक्तीबाबत दसऱयानंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीचीच करण्यात आली आहे. आरटीपीसीआर नसणाऱया प्रवाशांना परत पाठविण्यात येत आहे. कर्नाटकसह बाहेरगावच्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना कोठून आलात?, कोठे जाणार आहात?, वाहनांमध्ये किती प्रवासी आहेत? याची नोंद करुन सोडण्यात येत आहे. आरटीपीसीआरची सक्ती मागे घेण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे. याबाबत तपास नाक्मयावरील अधिकारी पीएसआय प्रविण बिळगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरटीपीसीआर रिपोर्ट मागे घेतल्याचा कोणताही आदेश वरिष्ठांकडून अद्याप आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे या नाक्यावरील कामकाज पूर्ववत सुरु आहे‌. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घेण्यात येईल. या तपास नाक्यावर आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या, शिक्षण विभाग यासह अन्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारीही या नाक्मयावर सेवा बजावत आहेत.

Related Stories

फ्लाईंग स्कूलमुळे बेळगावचे देशात नाव होईल

Patil_p

महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार काळय़ा दिनातून व्यक्त

Patil_p

खडेबाजार शहापूर परिसरात पेव्हर्सच्या खालून सांडपाणी

Amit Kulkarni

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून दिलासा

tarunbharat

रविवारी जिल्हय़ात 194 नवे रुग्ण

Patil_p

शिवपुतळा चौथरा कामाचा बाळेकुंद्री खुर्द येथे शुभारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!