तरुण भारत

“पीएम केअर फंडात जमा होणारा पैसा कुठे जातोय?,” माजी न्यायमूर्तींनी उपस्थित केला प्रश्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी

पीएम केअर फंडामध्ये हजारो कोटी रुपये जमा होत आहेत. पण ते पैसे जातात कुठे? असा सवाल सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन. बी. लोकूर यांनी सरकारला केला आहे. लोकूर यांनी पीएम केअर फंडामध्ये जमा होणारा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहित नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. न्यायमूर्ती लोकूर माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पीएम केअर फंड याचं उदाहरण देत सरकारला सवाल केले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केलं जात असल्याने चिंता व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी पीएम केअर फंडचं उदाहरण दिलं असून त्यांसंबधीच्या माहितीचा अभाव असल्याचं सांगितलं आहे. पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणालेत की, “सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जात आहेत याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही”.

त्यांनी यावेळी बोलताना “उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडचं घेऊयात. यामध्येही करोडो रुपये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहिती नाही. तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही. याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात तसं झालं का? आपल्याला माहिती नाही,” असं जस्टीस लोकूर यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर गेलात तर तिथे २८ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट मिळतो. यामध्ये चार दिवसात ३००० कोटी जमा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत आहोत. पण हा पैसा कुठे जात आहे? आपल्याला माहिती नाही”. तसेच “२०२०-२१ मधील ऑडिट रिपोर्ट अद्याप तयार करण्यात आलेला नाही. एक वर्ष झालं आहे…आज १२ ऑक्टोबर आहे, पण ऑडिट रिपोर्टबद्दल कोणाला माहिती नाही,” असं सांगत न्यायमूर्ती लोकूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

Advertisements

Related Stories

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

औद्योगिक उत्पादनात समाधानकारक वाढ

Patil_p

शहरात लॉकडाउन, विमानात विवाह

Patil_p

फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, नेत्यांवर पाळत ठेवल्याप्रकरणी शिवसेनेची मागणी

triratna

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार – पीएम मोदी

triratna

पुदुच्चेरीचे काँग्रेस सरकार पराभूत

Patil_p
error: Content is protected !!