तरुण भारत

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ नको: चित्रा वाघ

मुंबई/प्रतिनिधी

गेल्या दीड ते दोन वर्षापासून राज्य महिला अध्यक्ष (State Women’s Commission) पदाची जागा रिक्त होती. त्यामुळे या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर रिक्त असणाऱ्या या जागेवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (NCP Leader rupali chakankar )यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांची अधिकृत घोषणा होण्याआधीच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला. चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका’, असे म्हणत चांगलाच घणाघात केलाय. ‘चाकणकरांची या पदी नेमणूक झाल्यास पक्षाचे वेळोवेली कापले जाईल’, अशी टीका करण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. यावर भाष्य करत चित्रा वाघ यांनी हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत. पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचे नाक कापले जाईल’, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

महापोर्टल परीक्षा घोटाळ्यातून नोकरी मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

triratna

लसीकरण धोरणाचा पुनर्विचार करा !

Patil_p

पुनीत बालन ग्रुप, ‘इंडस कोअर’ व सम्यक ट्रस्टतर्फे ५०० गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

prashant_c

भरोसा सेलने रोखला बालिकेचा बालविवाह

Patil_p

मिरवणुका, महाआरतीवर बंदी

Patil_p

टोळी युद्धातून खुनाचा कट उधळला

Patil_p
error: Content is protected !!