तरुण भारत

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष १० टक्के लाच घेतात”

बेंगळूर/प्रतिनिधी

सध्या कर्नाटकात काँग्रेसमधील वातावरण (Karnataka Congress) अलबेल असल्याचे पहायला मिळत आहे आणि त्यातच आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने काँग्रेस पुरती तोंडघशी पडलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (Congress state president DK Shivakumar) यांच्याशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधारी पक्ष भाजपानेही काँग्रेसवर निशाणा साधलाय. संबंधित व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार उग्रप्पा आणि कर्नाटक काँग्रेसचे मीडिया समन्वयक सलीम गुप्तपणे ) बोलताना दिसताहेत. या व्हिडिओत, मीडिया समन्वयक सलीम म्हणतात, शिवकुमार 10-12 टक्के लाच घेतात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेकडो कोटींची संपत्ती गोळा केलीय. याच व्हिडिओत सलीम यांनी शिवकुमार यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप करतानाही ऐकू येतंय.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे दोन नेते शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसताहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने (Karnataka Pradesh Congress Committee) पक्षाचे नेते व्ही. एस. उग्रप्पा (V. S. Ugrappa) यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय, तर पक्षाचे नेते सलीम अहमद यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय, त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Advertisements

या व्हिडिओमध्ये सलीम यांनी शिवकुमार आधी 6 ते 8 टक्के कमिशन घेत होते. मात्र, आता ते वाढवून 10-20 टक्के केले आहे. हा एक मोठा घोटाळा असून तुम्ही जितके जास्त खोदला तर जास्त बाहेर पडेल, असा आरोप त्यांनी केलाय. शिवाय, शिवकुमार यांचा सहयोगी मुलगुंडने 50 ते 100 कोटी कमावले आहेत, त्यामुळे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोपही सलीम यांनी केलाय.

Related Stories

कर्नाटक पोटनिवडणूक: सतीश जारकिहोळी सर्वात श्रीमंत उमेदवार

triratna

राजोरीत दहशतवाद्यांच्या गटाला घेरले

datta jadhav

बेंगळूर : बीबीएमपी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर निर्बंध आणणार

triratna

राज्यातील अनलॉकचा गोंधळ आज दुपारपर्यंत दूर होण्याची शक्यता; विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

triratna

महापुराच्या प्रश्नावर महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री भेटणार

triratna

नव्याने शोध लागलेल्या कोळ्याच्या प्रजातीला 26/11 हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव

Rohan_P
error: Content is protected !!