तरुण भारत

मातोंडला सौ. नम्रता परब ठरल्या पैठणीच्या मानकरी

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

नवरात्रोत्सव २०२१ निमित्त तालुक्यातील मातोंड गावात आयोजित महिलांसाठी “होम मिनिस्टर” स्पर्धेत मातोंड येथील सौ. नम्रता शैलेश परब या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

Advertisements

   मातोंड येथील समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी मातोंड यांच्या सहकार्याने, श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळ मातोंड आयोजित व कै. देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय अविनाश परब यांच्यावतीने पुरस्कृत गावतील महिलांसाठीच्या “होम मिनिस्टर” स्पर्धा बुधवारी (१३ ऑक्टो.) आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या स्पर्धेत उपविजेत्या सौ वैभवी विलास परब व तृतीय विजेत्या सौ रेश्मा राजन नेमण यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर सहभागी १७ स्पर्धकांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. 

Related Stories

विनयभंगातील संशयितांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप

triratna

दत्तक मुले घेण्यात चंद्रकांत सावंत यांचे राज्यात रेकॉर्ड

NIKHIL_N

‘जेल पर्यटन’ प्रकल्पात रत्नागिरी विशेष कारागृह!

triratna

मालवणात मनसेकडून 100 कुटुंबियांना धान्य वाटप

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन कायम

triratna

आत्मा कमिटी अध्यक्षपदी प्रेमानंद देसाई यांची फेरनिवड

NIKHIL_N
error: Content is protected !!