तरुण भारत

`’त्यांच्या’ मिशीला बारामतीचं खरखटं -माजी मंत्री सदाभाऊ खोत

प्रतिनिधी / कोल्हापूर

हंगाम आला की एखाद्या विषय घेऊन गोंधळ घालायचा राज्यात काहीही झालं तरी केंद्राच्या नावाने खडे फोडण्याची काहींना सवय लागली आहे. विविध यात्रांच्या माध्यमातून सध्या हेच सुरु आहे. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. त्यांच्या मिशीला बारामतीतील आमरसाचे खरखटं लागल्यामुळे हे सुरु आहे. अशा तिखट शब्दात खोत यांनी शेट्टी यांचा समाचार घेतला. गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे केंद्राचे कोणतेही धोरण नसल्याचे मला पत्र दिले त्यामुळे काहींचा पोटेशूळ उठला. पत्र इंग्रजीत असल्याने मला इंग्रजी वाजता येत नाही अशी टिका झाली ते खरं आहे. पण मला इंग्रजी चांगल कळतय असा टोला हाणला. राजू शेट्टी यांचे नाव न घेता ते म्हणाले, मंत्री गोयल यांनी फसवले आहे. शासन निर्णय का काढला नाही असा सवाल काही लोक उपहस्थित करत आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे धोरण नाही, निर्णय नाही पूर्वीचा निर्णय कायम आहे. असे असताना शासन निर्णय करण्याची मागणी हस्यस्पद आहे.

कृष्णेतील पाणी गडप झाल्याने जलसमाधी नाही

पूरग्रस्तांचे प्रश्न घेऊन शेट्टी यांनी काढलेल्या जलसमाधी परिक्रमा यात्रेवरही सदाभाऊ खोत यांनी चांगलाच समाचार घेतला. कृष्णेतील पाणी गडप झाल्याने जलसमाधी करता आली नाही अशी बोचरी टीका केली. सरकारमध्ये सहाभागी असताना यात्रा कशल्या काढता. अशा शब्दात त्यांनी फटकारले ते म्हणाले बारामतीकरांच्या मांडीवर बसता त्यांच्याकडून निर्णय करुन घेणे सोपं होतं पण जनतेची दिशाभूल करारायची यात्रा काढायची, आंदोलन करायच, नंतर चर्चेची तयारी ठेवायची आमंत्रण आलं की चर्चा होते. आंदोलन संपत आणि आपल्यामुळे प्रश्न सुटला असे भासवायचे ही त्यांची जुनीच पद्धत असल्याचे सदाभाऊ यांनी सांगितले. लोकभावनेला हात घालण्याचे दिवस आता संपले आहेत. चांगल वाईट जनतेला कळते त्यामुळे यापुढे दिशाभूल करण्याचे बंद करावे, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यापाल भला माणूस

शेट्टी यांच्या विधान परिषद नियुक्तीवर सदाभाऊ यांनी उपरोधात्मक टीका केली ते म्हणाले, राज्याला कध नव्हे इतका अभ्यासू, चांगला, राज्यपाल मिळालेले आहेत. कोश्यारी माणसं ओळखणारे राज्यपाल आहेत. असे सांगत त्यांनी शेट्टी यांना विधान परिषद सहजा सहजी मिळणार नाही असे संकेतच दिले.

Advertisements

Related Stories

रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात

Patil_p

कराडात जेव्हा रस्त्यावर कचरा पडतो…

Patil_p

विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई

triratna

लोकमान्य टिळकांच्या रक्षेचे कोल्हापुरात जतन!

triratna

महाराष्ट्र : मंदिरे उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? : राज ठाकरे

Rohan_P

गांधीनगर येथे एकाचा खून, एक ताब्यात तर एक फरारी

triratna
error: Content is protected !!