तरुण भारत

सावरवाडी येथे ऊस शेतीस आग; अडीच लाखाचे नुकसान

कसबा बीड / प्रतिनिधी

सावरवाडी तालुका करवीर सावरवाडी येथे आज गुरुवारी खणीचा माळ या ठिकाणच्या ऊस फडास आग लागून जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावरवाडी येथील गट क्रमांक ६३७ मधील नामदेव केशव दिवसे, गट क्र.६१५ शंकर महादेव दिवसे यांचे मालकीची एक एकर ऊस जमिन आहे. सकाळी सुमारे १० वाजता सारे गाव खंडेनवमी निमित्य देवालयात असलेले पाहुन अज्ञाताने ऊसास आग लावली, अशी शक्यता आहे.

ऊसास आग लागली हे धूर व जळलेल्या धुवा, आवाज या आधारे लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकरी यांनी मिळून आग आटोक्यात आणली. वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा जवळपास १० एकर क्षेत्रातील ऊस पेटला असता.

Advertisements

Related Stories

ऑक्सिजन संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू

triratna

कोल्हापूर : खोची ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम

triratna

आरकेनगरातील मुलाचा विहरीत बुडून मृत्यू

triratna

रेकॉर्डवरील अप्पाने पिस्तुल खरेदी केली मध्य प्रदेशात

triratna

कोल्हापूर : मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अतिप्रसंग

triratna

कोल्हापूर : पेठ वडगावचे कोविड सेंटर ३० ऑक्टोबरपासून बंद होणार

triratna
error: Content is protected !!