तरुण भारत

सातारा : ‘लसीकरण मोहिमेच्या गतीसाठी वॉर्ड निहाय समित्या कार्यान्वीत करा’

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

पतिनिधी / सातारा

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब सकारात्मक असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. यासाठी गाव निहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय यादी तयार करुन वॉर्ड समित्या कार्यान्वीत करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या, असे निर्देश सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. ल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक घरनिहाय सर्व्हेक्षण करा.ग्रामीण भागातील सर्व्हेक्षणासाठी ग्रामसेवक व आशा सेविका यांची मदत घ्या. मंजुरांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे. यामध्ये सकाळी व संध्याकाळी मजुरांसाठी लसीकरण करण्यात यावे असे निर्देश दिले.

मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 99 हजार 33 नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 83 टक्के पहिला डोस व 36 टक्के दुसरा डोस झाला आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सारखी आणखी एक मोहिम दिवाळीनंतर राबवावी. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे. तरी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सातारा : शासनाच्या अनागोंदी कारभाराचा आर्थिक भुर्दंड पालकांना कशासाठी?

datta jadhav

सातारा जिल्ह्यात ३३७ कोरोना बाधित ; तर ११ मृत्यू

triratna

दक्षता सप्ताह निमित्ताने लाच लुचपतचे पोलीस उपअधीक्षकांची भ्रष्टाचार विरोधी जनजागृती

triratna

म्हसवडच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरीचे अतिकडक एका पायावरचे “उभ्या नवरात्राचे व्रत” सुरु

Omkar B

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

triratna

विद्यार्थी हो…., पाठय़पुस्तक जपून ठेवा’

Patil_p
error: Content is protected !!