तरुण भारत

“शरद पवारांची भूमिका शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी..”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांचा आरोप

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीन टप्प्यातल्या एफआरपी बाबत घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे.

Advertisements

दहा वर्षापासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी गुन्हे दाखल करून घेतले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. खा. राजू शेट्टी यांनी तीन वेळा प्राणांतिक उपोषण केले होते. त्यागातून हा कायदा तयार झालेला आहे आणि हा कायदा मोडण्यासाठी काही कारखानदार व सत्तेतील पुढारी सरकारची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांची बाजू शरद पवार यांनी घेणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखेच आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत हेच साखर कारखानदार डुबत्या जहाजातून पक्षाला सोडून पळून गेली होती. पण आपण सातारा येथील सभेत पावसात भिजला आणि हाच ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, याचं बक्षिस आम्हाला तुम्ही देत आहात का ? असाच सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

कोरोना, महापुर, अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून पडला असताना शेतातील उभ्या असलेल्या ऊसावर शेतकऱ्यांना कोरोनात दवाखान्यासाठी काढलेलं कर्ज, बँक सोसायटी पतसंस्थेचे कर्ज, लाईट बिल, मुलांचे शिक्षण, खते, बी-बियाणे, किराणा दुकानदार उधारी, मुलीच्या लग्नकार्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक खर्च करावा लागला आहे. “एक रकमी एफआरपी आमच्या हक्काची” या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद पवार यांना ऊस उत्पादक शेतकरी पत्र पाठवून देणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील व जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पत्र पाठवण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.

कायदा मोडीत निघाला तर कोट्यावधीची ऊस बिले बुडतील

एकरकमी एफआरपीचा कायदा असताना साखर कारखानदार एक वर्ष झाले तरी बिल देत नाहीत. कायदा मोडीत निघाला तर ऊसाची बिलं बुडतील. या आधीही कोट्यवधीची ऊसबिले बुडली आहेत. त्यामुळे कायदा टिकला पाहिजे.

Related Stories

अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्यास ठार करण्यात वनविभागाला यश

triratna

बार्शीत शालेय पोषण आहारातील ११० टन तांदूळ झाला वाटप

triratna

सोलापूर : माढा तालुक्यात नवे २१ कोरोना बाधित

triratna

राजगृहावरील तोडफोड प्रकरणी सोलापुरात निदर्शने

triratna

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

triratna

सोलापूर : करमाळा बाजार समितीत उडीदाला विक्रमी भाव ; ८४०१ रुपये उच्चांकी दर

triratna
error: Content is protected !!