तरुण भारत

दसरा सोहळ्यास निमंत्रितांनाच प्रवेश

पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून सोहळ्याचा आढावा, दसरा चौकाकडे येणारे मार्ग बंद

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

करवीर नगरीचा ऐतिहासीक पारंपारिक दसरा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. उत्सव समितीच्या वतीने निंमंत्रितांना पास देण्यात आले आहेत. हे पास पाहूनच सोहळ्यास प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. दसरा चौक मैदानाकडे येणारे मार्ग 100 मिटर अंतरावर बंद करण्यात येणार आहेत.

गतवर्षी कोरोना संकटामुळे करवीर नगरीतील ऐतिहासीक दसरा सोहळा जुना राजवाडा येथे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला होता. यावर्षी दसरा चौक येथे दसरा सोहळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ मोजक्याच निमंत्रीतांना प्रवेश देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दसरा चौक मैदानाची व सोहळ्याच्या तयारीची पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी गृह पोलीस उपअधिक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, प्रमोद जाधव, शशिराज पाटोळे, दत्तात्रय नाळे, स्नेहा गिरी उपस्थित होते.

500 ऐवजी 250 खुर्च्या
मोजक्याच निमंत्रितांना प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे यंदा खुर्च्यांची संख्या 500 वरुन 250 करण्यात आली आहे. या खुर्च्याही कोरोना नियमांचे पालन करुन बैठक व्यवस्था आयोजीत केली आहे. दोन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवून खुर्च्यांची मांडणी करण्यात आली आहे.

दसरा चौकाकडे येणारे मार्ग बंद
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकाकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. सिपीआर चौक, शहर वाहतूक शाखा, टायटन शोरुम, मुस्लीम बोर्डिंग येथे बॅरिकेटींग करुन दसरा चौकाकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरीकांना या ठिकाणी उभा राहून सोहळा पाहता येणार आहे.

फेसबुक लाईव्हची व्यवस्था
ऐतिहासीक दसरा सोहळा फेसबुक लाईव्ह, तसेच देवस्थान समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या स्क्रिनद्वारे ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. देवस्थान समितीच्या वतीने प्रमुख चौकांसह, उपनगरांत भाविकांसाठी गेल्या 8 दिवसांपासून स्क्रिनची व्यवस्था केली आहे. या स्क्रिनवर हा सोहळा पाहता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांना दसरा सोहळ्यास प्रवेश दिला जाणार आहे. नागरीकांनी या सोहळ्याचा आनंद ऑनलाईन पद्धतीने घ्यावा असे आवाहना पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.

Related Stories

कायद्याचा योग्य अर्थ लावून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत

triratna

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ‘म्हाडा’च्या २,८९० घरांसाठी लॉटरी

triratna

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

Rohan_P

कोल्हापूर : मोका प्रकरणातील आरोपी भीमा चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या

triratna

दिल्ली सरकार : गरजूंना मिळणार घरपोच रेशन; गव्हाऐवजी तयार पीठ देणार

Rohan_P

पावसाच्या तुरळक सरींमुळे शेतकरी व ऊसमजूर हवालदिल

triratna
error: Content is protected !!