तरुण भारत

कोगे-बहिरेश्वर बंधाऱ्यासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

आ.पी.एन.पाटील यांची माहिती, लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार

सांगरुळ/प्रतिनिधी

Advertisements

भोगावती नदीवरील जिर्ण झालेल्या कोगे ते बहिरेश्वर दरम्यानच्या बंधाऱ्यासाठी एक कोटी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहीती आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी दिली.

या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने आज कोल्हापूर येथे बोलावलेल्या बैठकीत आ. पाटील यांनी ही माहीती दिली. परिसरातील ऊस व इतर वाहतुकीसाठी हा बंधारा महत्त्वाचा असून या बंधाऱ्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी आ. पाटील यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे दिनांक १ जुन २०२१ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांना भेटून याबाबत चर्चा केली होती.

त्यानुसार सदर बंधारा दुरूस्तीसाठी १ कोटी २० लाख निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच कामास सुरवात होणार आहे, असे सांगून या बंधाऱ्यावर जवळपास १५ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाचे अंदाजे १८०० हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्या सर्वांची अडचण दूर होणार आहे, असे आ.पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परीषद सदस्य सुभाष सातपुते, उपविभागीय अभियंता पी.जे.माने, कोगे शाखाधिकारी राकेशकुमार नाझरे, राधानगरी पाटबंधारे शाखाधिकारी समीर निरूखे, सहाय्यक अभियंता वीरेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.

   

Related Stories

नंदगाव येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

triratna

केंद्र सरकारने साखरेला ३७ रुपये हमीभाव द्यावा : नरके

triratna

कबनूर येथे आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

कोरोनामुळे छत्र हरवलेल्या मुलांना दत्तक घेणार – काडसिद्धेश्वर स्वामी

triratna

कोल्हापूर : मराठ्यांचे आता डीजिटल वॉर!

triratna

‘मेंढपाळांना स्थलांतरासाठी जिल्हाबंदी आदेशातून वगळावे’

triratna
error: Content is protected !!