तरुण भारत

‘100 कोटी डोस’नंतर भाजपकडून मेगा इव्हेंट

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

देशात 96.75 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुढील आठवडय़ात 100 कोटी डोसचा आकडा पार होणार असल्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने महामारीच्या विरोधात याला स्वतःची मोठी कामगिरी म्हणून दाखविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Advertisements

स्वतःच्या मेगा आउटरीच प्लॅनच्या अंतर्गत भाजपने स्वतःच्या मंत्री, खासदार आणि आमदार तसेच राष्ट्रीय अन् राज्याच्या पदाधिकाऱयांना लसीकरणाच्या कार्यक्रमात सामील होण्यास सांगिले आहे. भाजपची ही योजना प्रामुख्याने पुढील वर्षी निवडणूक होणाऱया राज्यांमध्ये लागू केली जाणार आहे.

100 कोटी डोसचा आकडा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजेमुळे लसीकरणाची प्रक्रिया सध्या काहीशी मंदावली आहे. सरकार दसऱयानंतर लसीकरणाला पुन्हा वेग देण्याची योजना आखत आहे.

आउटरीच प्रोग्राम अंतर्गत भाजप नेते, मंत्री, खासदार लसीकरण केंद्रांवर जाऊन डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱयांचा सन्मान करणार आहेत. पक्ष या संधीचा केंद्राच्या अन्य लोककल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्यासाठी वापर करणार आहे.

Related Stories

पूर्व वर्धमान -तृणमूलचा प्रभाव ओसरतोय

Patil_p

अखिलेश यादव यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय

Abhijeet Shinde

सैनिकांना सुरक्षित ठेवणारे ‘घर’

Patil_p

कोरोना चाचण्यांची संख्या कमी करु नका

Patil_p

जूनमध्ये निर्यात 48 टक्क्यांनी वाढली

Patil_p

उत्तराखंडमध्ये 47 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 3300 पार

Rohan_P
error: Content is protected !!