तरुण भारत

कोळसा पुरवठा केवळ वीजनिर्मिती केंद्रांनाच

कोल इंडियाने वीज नसलेल्या ग्राहकांचा पुरवठा तात्पुरता थांबवला

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

Advertisements

कोळशाच्या टंचाईला तोंड देत देशातील वीजनिर्मित संयंत्रांदरम्यान कोल इंडिया लिमिटेड (सीएएल) कंपनीने बिगर-ऊर्जा क्षेत्राला कोळसा पुरवठा तात्पुरता बंद ठेवला आहे. वीजनिर्मिती न करणाऱया पुरवठादार कंपन्यांना पुढील काही दिवस पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचे कोल इंडियाची शाखा असलेल्या साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (एसईसीएल) निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. राष्ट्रहित विचारात घेऊन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेतल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसात देशात कोळशाची टंचाई जाणवू लागली आहे. काही तांत्रिक समस्या आणि दरवाढीमुळे ही टंचाई जाणवत आहे. वीजनिर्मिती केंद्रांना आवश्यकतेप्रमाणे कोळशाचा पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झालेला दिसतो. बऱयाच राज्यांमधील वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ही समस्या निर्माण झाल्यानंतर काही ठिकाणी भारनियमनही सुरू करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कोल इंडिया या पुरवठादार कंपनीने कोळसा पुरवठय़ाच्या निकषात तात्पुरते बदल केले आहेत. कंपनीने वीज क्षेत्रासाठी असलेल्या कोळशाचे सर्व ऑनलाईन लिलाव बंद केले आहेत.  

Related Stories

महाआघाडीची 126 जागांवर आघाडी

datta jadhav

उत्तराखंड : शहराच्या तुलनेत डोंगराळ भागात कोरोनाचा संसर्ग अधिक

Rohan_P

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 614 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

Patil_p

कलह संपविण्याकरता काँग्रेसमध्ये हालचाली

Patil_p

4 ‘एम’च्या बळावर ममतांनी मारली बाजी

Patil_p

पमेरियन कुत्र्यामुळे पोलिसांची डोकेदुखी

Patil_p
error: Content is protected !!