तरुण भारत

देशात उपासमारीची स्थिती चिंताजनक

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील मुलभुत गरजा अपुऱ्या पडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट आहे. कारण जागतिक भूक निर्देशांकात भारत सात स्थानांनी घसरला असुन देशातील भुक पातळी चींताजनक असल्याचे चीत्र समोर आले आहे. २०२१ मध्ये भारत ११६ देशांमध्ये १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२० मध्ये या यादीत भारताचा ९४ वा क्रमांक होता. एका वर्षातच भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंड आणि जर्मनीची यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी खालावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच निमित्ताने कुपोषित बालक श्रेणीत भारताची जगात सर्वात वाईट कामगिरीचा आलेक दाखवत काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. गेल्या पाच वर्षात कुपोषित बालक श्रेणीत भारताची जगात सर्वात वाईट कामगिरी असल्याचा आलेख दर्शवत काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. सावंत यांनी गेल्या पाच वर्षातील भारताची कामगिरी ही पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या राष्ट्रांपेक्षा ही खालावली असल्याचे म्हटले आहे.

यामुळे 5 वर्षांखालील बालकांच्या कुपोषणात वाढ झाली असुन गेल्या 5 वर्षांपासूनच्या काळात ही कामगिरी जगातील सर्वात वाईट कामगिरी असल्याचं भाष्य केलं आहे. ही मुद्देसुद आकडेवारी देत सावंत यांनी भाजपच्या वर्मी घाव घातला आहे. यावर भाजप नेते काय भाष्य करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

इचलकरंजीत आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

उत्तराखंडातील कोरोना : मागील 24 तासात 990 जणांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.07%

Rohan_P

आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं हा आजचा Top Trending हॅशटॅग ; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

Abhijeet Shinde

‘लक्ष्मीबाई’च्या किल्ल्यातून वायुदलासाठी हेलिकॉप्टर्स

Patil_p

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!