तरुण भारत

काश्मिरी पंडित आणि भाजपाशी संबंधित २०० नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानमध्ये ISI ची बैठक

नवी दिल्ली /प्रतिनिधी

काश्मिरी पंडित आणि भाजपाशी संबंधित लोक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून २०० नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानमध्ये ISI ची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक दहशतवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. याबैठकीत काश्मिरी पंडित आणि भाजपाशी संबंधित लोकांच्या हत्येविषयी चर्चा झाली आहे. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचे काही विशेष तपशील इंडिया टुडेने मिळवले आहेत. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआयचे अधिकारी आणि दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या या गोपनीय बैठकीची माहिती मिळाली. त्यानुसार, एजन्सींनी अलर्ट जारी केला आहे.

या बैठकीत आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची योजना तयार केली होती. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना मारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यत्वे पोलीस, सुरक्षा दल, गुप्तचर खात्यांसोबत काम करणाऱ्या काश्मिरींना ठार मारण्याचे ठरले होते. आयएसआय अधिकारी आणि दहशतवादी गटांचे नेते यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत काश्मिरी नसलेल्या लोकांना आणि भाजपा तसेच आरएसएसशी संबंधित लोकांनाही मारण्यासाठी लक्ष्य म्हणून निवडण्यात आले होते. आयएसआयने काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण करण्यासाठी २०० लोकांची हिट-लिस्ट बनवून त्यांची हत्या करण्याची योजना आखली होती. भारत सरकारच्या जवळचे मीडिया कर्मचारी आणि भारतीय एजन्सी आणि सुरक्षा दलांचे स्रोत आणि माहिती देणाऱ्यांव्यतिरिक्त, या यादीत अनेक काश्मिरी पंडितांची नावे समाविष्ट आहेत.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! एका दिवसात 832 जणांनी गमावला जीव

Rohan_P

7 महिन्यांनी झायरा वसीम सक्रीय

Patil_p

एका दिवसात आढळले 83 हजार 341 रुग्ण

Patil_p

युगांडात नग्न होऊन पळाले 200 कैदी

Patil_p

दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के?

Abhijeet Shinde

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात

Rohan_P
error: Content is protected !!