तरुण भारत

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही: फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे

नागपूर/प्रतिनिधी

Advertisements

गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना उत्सुकता होती ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. अखेर शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार आणि कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना थेट केंद्र सरकारविरोधात दंड थोपाटले. मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात ड्रग्ज, गांजा आणि अदानीवरून थेट मोदी सरकारलाच सवाल केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट मोदींविरोधातच दंड थोपटल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी राज्यात जनतेनं भाजपाला नाकारल्याचेही ते यावेळी म्हणाले. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यावरून भाजपवर तोफ डागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनाही ठाकरेंवर पलटवार केला आहे. वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.

फडणवीस पुढे म्हणाले, “काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”.

Related Stories

केजरीवाल सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

कोयना पाणीसाठय़ाचे नवीन तांत्रिक वर्ष सुरू

Patil_p

नासाच्या दोन अंतराळवीरांसह ‘Space X’ रॉकेटचे अवकाशात यशस्वी उड्डाण

datta jadhav

पीक कर्जासाठी किसान सभा आंदोलन छेडणार

Abhijeet Shinde

छत्तीसगड : राजधानी रायपूरमध्ये 9 ते 19 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन!

Rohan_P

सुदानमध्ये आता लोकशाही नांदणार

datta jadhav
error: Content is protected !!