तरुण भारत

प्रयाग चिखली पुनर्वसनसाठी 20 ऑक्टोबरला सर्व्हेक्षण करा

प्रतिनिधी / कोल्हापूर

करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि प्रयाग चिखली गावातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात 20 ऑक्टोबर रोजी सर्वेक्षण करून स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आंबेवाडी आणि प्रयाग चिखली ग्रामस्थांशी पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.

Advertisements

पंचगंगा नदीकाठावर असलेल्या प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावांना 1989, 2005, 2019 आणि 2021 साली महापुराचा फटका बसला. 1989 सालीच प्रशासनाने प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांचे सोनस्थळी या ठिकाणी पुनर्वसनाचे आदेश दिले होते. त्यानुसार काही पूरग्रस्त स्थलांतरित झाले. मात्र अद्याप ज्यांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रयाग चिखली आणि आंबेवाडी ग्रामस्थांची बैठक पार पडली.

या बैठकीत प्रयाग चिखलीचे सरपंच सिकंदर मुजावर यांनी 410 प्लॉट आम्हाला लागू झाले आहेत ते मिळावेत. सोनतळी या ठिकाणी बाहेरची माणसे आलेली आहेत. मिळेल त्या ठिकाणी आम्हाला प्लॉट द्या. आम्ही यासाठी तयार आहोत. अशी मागणी केली. यावेळी प्रशासनाचे 302 प्लॉट शिल्लक असून 168 प्लॉटवर काही लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे सांगितले. गोकुळचे संचालक एस आर पाटील यांनी प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली. यावेळी दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील पुनर्वसनाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले.

दोन्ही गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री पाटील म्हणाले, कायदेशीर बाबी लक्षात घेता 1989 चे पुनर्वसन झाल्याशिवाय पुढे काहीच करता येणार नाही .पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढून आंबेवाडीचे पुनर्वसन झाल्यानंतर प्रयाग चिखलीचे पुनर्वसन करता येईल. प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी पारदर्शक काम करून शंभर टक्के पुनर्वसन करावे. पहिल्यांदा आदेश तपासून याबाबत सर्वेक्षण करून जे उर्वरित प्लॉट आहेत, त्यामध्ये प्रथम आंबेवाडीचे पुनर्वसन करावे. त्यानंतर प्रयाग चिखली गावाचे पुनर्वसन करावे. यासाठी 20 ऑक्टोबर रोजी सर्वेक्षण करून स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तलाठी श्रीकांत नाईक, गोकुळचे संचालक एस आर पाटील, सरपंच सिकंदर मुजावर, तंटामुक्त अध्यक्ष राम जाधव, मारुती पाटील, सरदार साळोखे, सरदार मिसाळ, संपत दळवी, केर्ली

Related Stories

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील आरोग्य सेविका कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये दोन गटात हाणामारी, चौघे जखमी

Abhijeet Shinde

मंत्री मुश्रीफ १४ दिवस निवासस्थानी कोणालाही भेटणार नाहीत

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 48 रूग्ण, 12 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लवकरच चाखायला मिळणार ‘बीटी’ वांग्याची चव

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!