तरुण भारत

एपीएमसी बाजारात बटाटा दरात वाढ

जवारी बटाटा प्रतिक्विंटल 350 रु. नी वाढला, कोथिंबीर दरातही कमालीची वाढ

वार्ताहर/ अगसगे

Advertisements

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारात जवारी बटाटय़ाचा भाव प्रति क्विंटल 350 रुपयांनी वाढला. तर कोथिंबीरीचा भाव शेकडय़ाला 500 रुपयांनी वाढला आहे. कांद्याचा भाव प्रति क्विंटलला 300 रुपयांनी कमी झाला. तर रताळय़ाचा भाव स्थिर असून भाजी पाल्यामध्ये काही भाज्याचे भाव वाढले आहेत. तर काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत.

गुरुवारी खंडी पूजन व शुक्रवारी दसरा असल्याने शेतकऱयांनी शिवारातील कामे बंद ठेवली होती. यामुळे मार्केट यार्डमध्ये शनिवारी बटाटय़ाची आवक तुरळक प्रमाणात आली होती. यामुळे जवारी बटाटय़ाच्या सवालात खरेदीदारामध्ये चढा-ओढ होऊन बटाटय़ाचा भाव प्रति क्विंटलला 350 रुपयांनी वाढला व रताळय़ाची आवक देखील कमी प्रमाणात आली होती. व परराज्यातून मागणी कमी असल्याने रताळय़ाचा भाव प्रति क्विंटलला स्थिर असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.

कांदा 300 रुपयांनी कमी

बुधवारी कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचा भाव प्रति क्विंटल 2000 ते 4000 रु. भाव झाला होता. भाव वाढल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आली होती. कांद्याचा भाव वाढल्याने हॉटेल, मेस, कॅन्टीन, बार, रेस्टॉरंटमधून कांद्याला मागणी कमी झाली होती. आवकेत वाढ व मागणी कमी झाल्याने कांद्याचा भाव प्रति क्विंटलला 300 रुपयांनी कमी झाला.

कोथिंबीरचा भाव वाढला

घटप्रभा येथील जवारी कोथिंबीरला गोवा, कोकण, कारवार व बेळगाव तालुक्यामध्ये मागणी जास्त असते. कोथिंबीरची आवक शुक्रवारी दसरा असल्याने काढणी थांबली होती. यामुळे कोंथिबीरचा भाव शेकडय़ाला 500 रुपयांनी वाढला असल्याची माहिती भाजी व्यापारी प्रशांत पाटील यांनी दिली.

शनिवारी मार्केट यार्डमध्ये महाराष्ट्र कांद्याची 14 ट्रक व कर्नाटक कांद्याची 65 ट्रक आवक, जवारी बटाटय़ाची 2500 पोती व रताळय़ाची 1800 पोती, इंदोर बटाटा 8 ट्रक, आग्रा बटाटा 5 ट्रक आवक विक्रीसाठी दाखल झाली होती.

जवारी बटाटा प्रति क्विंटल

गोळी 400 ते 500 रु.

मिडीयम 1300 ते 1600 रु.

मोठवड 1800 ते 2100 रु.

गोळा 2100 ते 2250 रु.

इंदोर बटाटा 1600 ते 1700 रु.

आग्रा बटाटा 1000 ते 1300 रु.

तळेगाव बटाटा 600 ते 1200 रु.

महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल

गोळी 1800 ते 2200 रु.

मिडियम 2500 ते 3100 रु.

मोठवड 3200 ते 3500 रु.

गोळा 3500 ते 3700 रु.

कर्नाटक कांदा प्रति क्विंटल

गोळी 500 ते 1200 रु.

मिडियम 1800 ते 2200 रु.

मोठवड 2200 ते 2500 रु.

गोळा 2500 ते 2700 रु.

प्रति दहा किलो भाव

ढबू मिरची 500 ते 600 रु.

बिन्स 450 ते 500 रु.

कारली 250 ते 280 रु.

दोडकी 220 ते 250 रु.

कोबी 100 ते 150 रु.

इंग्लिश गाजर 200 ते 250 रु.

भेंडी 280 ते 300 रु.

फ्लॉवर प्रति डझन 300 ते 350 रु.

टोमॅटो ट्रे 800 ते 1000 रु.

गवार 250 ते 300 रु.

बिट 180 ते 200 रु.

काकडी 180 ते 200 रु.

अल्ले नवीन 200 ते 250

अल्ले जुने 450 ते 500 रु.

दूध भोपळा डझन 150 ते 200 रु.

गोल भोपळा प्रति क्विंटल 1200 ते 1400 रु.

शेकडा भाव

मेथी 1200 ते 1500 रु.

शेपू 500 ते 600 रु.

पालक 300 ते 500 रु.

कांदा पात 300 ते 400 रु.

कोथिंबीर जवारी 2500 ते 3000 रु.

कोथिंबीर इंग्लिश 1500 ते 2000 रु.

Related Stories

‘मी जिवंत आहे’मुळे प्रकरणाचा छडा

Amit Kulkarni

न्यू सैनिक सोसायटीच्या चेअरमन-सेक्रेटरीवर फौजदारी गुन्हा

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे धुरळा उडून वाहनचालक हैराण

Amit Kulkarni

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यश संपादन करा

Omkar B

बालकामगार पद्धत रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे

Patil_p

बेकिनकेरेत शनिवारपासून बैलगाडी शर्यत

Amit Kulkarni
error: Content is protected !!