तरुण भारत

सांगली : किरकोळ कारणावरुन तरूणाला बेदम मारहाण, पाच जणांवर गुन्हा

कुपवाड / प्रतिनिधी

किरकोळ कारणावरुन जाब विचारत पाच जणांनी कुपवाडमध्ये हनुमाननगर भागात राहणाऱ्या निलेश नाथाजी चव्हाण या तरूणास दगड, चप्पल व काठीने बेदम मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी रेकॉर्डवरील पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यामध्ये संशयित सुरज रमेश काळे (रा.बुधगाव रोड), विनायक रामा पाटील (रा.कापसे प्लॉट), राजू अब्दुल शेख (रा.रामकृष्णनगर), आकाश उर्फ लोकेश लक्ष्मण जाधव (रा.हमालवाडी) व नितीन कल्लाप्पा कोष्टी (रा.कुपवाड) यांचा समावेश आहे. या पाच जणांनी ‘तु पोरांच्यात आमचे नाव बदनाम का करतोस? असे म्हणून मारहाण केल्याची फिर्याद जखमी निलेश चव्हाण याने दिली आहे.

Related Stories

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Abhijeet Shinde

हायरिस्क काळातही शिक्षक समिती शिक्षकांच्या सेवेसाठी तत्पर: बाळू कट्टीमनी

Abhijeet Shinde

सांगली : ज्येष्ठ नेते माजी सभापती उस्मान शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

‘स्वाभिमानी’ करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष आंदोलन

Abhijeet Shinde

“घोषणाबहाद्दर” मंत्री वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा : आमदार पडळकर

Abhijeet Shinde

केरोसीन पूरवठा पुर्ववत होण्यासाठी, आ. मानसिंग नाईक यांना निवेदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!