तरुण भारत

तुमचाही डांबर परफॉर्मन्स पाहता येईल

छोटय़ा पडदय़ावरचा स्टार अभिनेता शशांक केतकर यालाही ट्रोलचा सामना करावा लागला आणि त्याने त्याचा खरपूस समाचारही घेतला. शशांकच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात एक समंजस व मनमिळावू नायक म्हणून झाली. यापूर्वीच्या तिन्ही मालिकांमध्ये त्याने गुड बॉय साकारला.

कलाकार हा नेहमीच नव्या धाटणीच्या भूमिकेच्या शोधात असतो. तसे शशांकलाही जेव्हा खलनायकाची ऑफर आली तेंव्हा त्याने ती स्वीकारली. त्यावरूनच शशांकला ट्रोलिंग सुरू झालं. त्याच्या भूमिकेला एका नेटकऱयाने डांबर परफॉर्मन्स म्हणत कमेंट केली होती. त्यावरून शशांकने असं सुनावलं होते की तुमच्याकडे जर चांगली स्टोरी असेल आणि पैसा असेल तर मालिका काढा आणि त्यात अभिनय करा म्हणजे तुमचाही ‘डांबर परफॉर्मन्स’ आम्हाला पाहता येईल. किंवा वाहवत जाणाऱया मालिका थांबवा अशा कमेंटवरही शशांक भडकला होता. तुमचा व्यवसाय चालत नाही म्हणून दुकानाला कुलूप घाला म्हटलं तर तुम्हाला चालणार आहे का… एका मालिकेवर किमान शंभर जणांचे कुटुंब चालत असते, शिवाय कथेत काहीतरी चढउतार येणारच असं म्हणत शशांक त्या-त्या वेळी ट्रोलर्सना रिप्लाय देत असतो.

Advertisements

Related Stories

दीपिकाने इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरून सर्व पोस्ट केल्या डिलीट

Rohan_P

अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल; अटकेची टांगती तलवार

Rohan_P

‘सारेगमप’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Abhijeet Shinde

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

अभिषेकला नव्हता वेळ

Patil_p

अभिनेत्री वैदेही परशुरामी ठरली युवा तेजस्वी चेहरा

Patil_p
error: Content is protected !!