तरुण भारत

मगो पक्ष स्वबळावरच निवडणूक लढविणार

सुदीन ढवळीकरांची सिंह गर्जना. कासरपाल येथे मगो पक्षाची दसरा मेळावा सभा.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

येणारी निवडणूक हि स्वबळावर लढण्याचा निश्चय मगो पक्षाने केला असून प्रत्येकवेळी विश्वासघात करून मगोला संपविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपबरोबर युती करून मगोला राजकीय आत्महत्या करायची नाही. भाजपने आत्मचिंतन करावेच पण त्याच बरोबर आत्मपरिक्षणही करावे.  कालपर्यंत युती नको व एकला चलो रे म्हणणारा भाजप आज युतीसाठी युतीसाठी धडपडतो आहे. याचा अर्थ काय काढावा ? भाजपाने विकासाकडे नसुन विघटनाकडे गोव्याला नेऊन सोडले आहे. केवळ जनताच नव्हे तर निसर्गही भाजपवर कोपला असून यांचे दिवस आता संपले आहेत. मगो स्वबळावरच निवडणुक लढवून जिंकणार अशी सिंह गर्जना मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे केले.

डिचोली मतदारसंघात मगो पक्षातर्फे  कासरपाल येथिल संदिपक सभागृहात आयोजित केलेल्या “दसरा मेळाव्यात” प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री, तथा मडकई मतदार संघाचे आमदार सुदिन ढवळीकर बोलत होते. त्यांच्या सोबत व्यासपिठावर माजी आमदार नरेश सावळ, नगरसेविका एड. रंजना वायंगणकर व एड.अपर्णा फोगेरी, उपाध्यक्ष न्हानु नाईक, लाटंबारसे सरपंच ज्ञानेश्वर गावस, युवा अध्यक्ष रुपेश गावस, पंच व इतर मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ढवळीकर म्हणाले की,  संस्कृती बरोबर घेऊन जाणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मगो पक्ष पुढे नेण्यासाठी ज्या काही योजना असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो. गोवा स्वतंत्र होत असताना पोर्तुगिजांनी गोव्याची मोडतोड केली. सगळे पुल मोडले, पण भाऊसाहेबांनी एका वर्षात सर्व पुल उभारले. केहाच गाजावाजा केला नाही. पण आता एक मांडवी पुल बांधल्यावर केवढी जाहीरातबाजी. काल एक का?लेज सुरू केल्यावर केवढा उदोउदो. पण मगोने वाडय़ां?वाडय़ावर शाळा उभारल्या त्याचा कधीच गाजावाजा केला नाही. सरकार तुमच्या दारी म्हणजे जनतेची फसवणूक भाजप सरकार करित आहे. टिका सकारात्मक असावी.

संजिवनी साखर कारखाना मगोने आणला. शेतकऱयांना आधार देण्यासाठी. भाउसाहेबांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. कर्नाटक, महाराष्ट्र, केरला येथील उच्चशिक्षीत लोक गोव्यात आणले गेले. यामुळेच गोव्याचा विकास झाला. आता पाणी मोफत देण्याची घोषणा. पण धरण मगोने बांधले हे सांगायला विसरतात असे ढवळीकर म्हणाले.

यावेळी बोलताना नरेश सावळ म्हणाले की, हा मतदार संघ माझे कुटुंब, माझे सर्वांवर लक्ष आणि सर्वांविषयी मला आस्था आहे. लोक काहीही बोलू देत, त्याकडे लक्ष देऊ नका. आजची उपस्थिती आपले माझ्यावरील प्रेम दाखवून देत आहे. आम्हाला जिंकायचंय. हि प्रत्येकाची जबाबदारी असून मेहनतीने गेल्या पंधरा वर्षात आम्ही ही आमची ओळख तयार केली आहे. समाज घडविण्यासाठी आम्ही आमच्या जमीनीवर शाळा सूरू केली ही आमची समाजसेवा आहे. येथे उच्च माध्यमिक शाळा सुरू होईल. युवकांना नोकऱया मिळणे यासाठी आम्ही काम केले. आमच्या स्वतःच्या मुलांसाठी सरकारी नोकरी दिली नाही. समाजाला चांगले तेच द्यावे. आज बेरोजगारी वाढलेली आहे. मतदार संघाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे. लाटंबार्से औद्योगिक वसाहत मार्गी लावणे गरजेचे आहे. पण आमदाराच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प रेंगाळला. येथे किमान पाच हजार रोजगार उपलब्ध होउ शकतो.

आपण आमदार असताना आम्ही विधानसभेत आवाज उठविला. पण आमच्या पराजयानंतर प्रकल्प तसाच पडून आहे. आम्ही पक्षाबरोबर प्रमाणीकपणे राहणार. साळमध्दे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, डिचोली प्राथमीक आरोग्य केंद्राची सुधारणा करुन जिल्हा इस्पीतळ करणे हे प्रथम कर्तव्य. येथे सुवीधा वाढविणे, तज्ञ डा?क्टरांची उपलब्धता करणे आमचे लक्ष आहे. बहुउद्देशीय सभामंडप, सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी करण्याचे आमचे स्वप्न आहे. आम्ही आमदार असतो तर सर्व प्रकल्प आज मार्गी लागले असते. असेही नरेश सावळ पुढे म्हणाले.

सुरुवातीस कोमल संतोष चव्हाण हिच्या कथक नृत्याद्वारे गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत रुपेश गावस यांनी केले, आभार  प्रिया मळीक यांनी मानले तर  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यदुनाथ शिरोडकर यानी केले.

Related Stories

वझरी येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया

Omkar B

सरकारला कोविडची परिस्थिती

Patil_p

शिगांव येथील शेतकऱयांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा

Patil_p

पालये येथे घर फोडून सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी दोघांना पकडले

Amit Kulkarni

गोवा बागायतदारतर्फे 450 टन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

Omkar B

सोमवारी 423 कोरोनामुक्त, 391 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!