तरुण भारत

गूळ भेसळीसाठी उत्पादकांना जबाबदार धरा

– राज्यव्यापी गूळ परिषदेत व्यापाऱयांची मागणी

प्रतिनिधी/सांगली

Advertisements

गूळ उत्पादक भेसळ करतात परंतु अन्न औषध प्रशासन विभाग व्यापाऱयांना दोषी धरून कारवाई करते, व्यापाऱयांना गुन्हेगारी नजरेने पहिले जाते हे दुर्देवी असल्याच्या भावना व्यक्त करत गुळाच्या भेसळीसाठी व्यापाऱयांना नको तर उत्पादकांना जबाबदार धरा, अशी मागणी सांगलीत गूळ व्यापाऱयांच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये करण्यात आली. तर सांगलीत गूळ भेसळ तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी केली.

  रविवारी मार्केट यार्ड येथील सहकार मंगल कार्यालयात ही परिषद पार पडली.  अध्यक्ष शरद शहा हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. परिषदे दरम्यान झालेल्या विविध मागण्यांचे निवेदन अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्याचा निर्णय झाला. यावेळी राज्यभरातून आलेल्या गूळ व्यापारी प्रतिनिधींनी अन्न औषध प्रशासन विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुंबईची गूळ बाजारपेठ शंभर टक्के ग्राहक केंदीत आहे. अन्न औषध प्रशासनकडून व्यापाऱयांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. प्रत्येक दिवाळीला आमच्याकडून पैसे घेतात पुन्हा गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात अशी तक्रार मुंबई गूळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपकभाई शहा यांनी केली. व्यापाऱयांआधी मार्केट कमिटÎांना कारागृहात घाला, उत्पादकांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. पुणे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेठिया यांनी कलम 80 नुसार गूळ व्यापाऱयांकडे वॉरंटी आणि बिल असेल तर गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे सांगितले. प्रत्येक बाजार समितीने गुळाची भेसळ तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

 निरा गूळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश शहा यांनी मात्र व्यापारी आणि उत्पादकांनाही चांगलेच सुनावले. पूर्वी गुळात साखर नसायची. पण अलीकडे शंभर टक्के गुळात साखर असते. याला दोषी कोण याबद्दल वरकरणी चर्चा करण्याऐवजी मुळापर्यंत जाण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उत्पादकाला अन्न औषधचा परवाना सक्तीचा करा आणि हा परवाना असल्याशिवाय व्यापाऱयांनीही गूळ उतरून घेण्यास नकार द्यावा, असे आवाहन केले.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी गूळ व्यापाऱयांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच बैठक लावण्याची ग्वाही दिली. तर मुजीर जांभळीकर, विक्रम खडे यांचीही यावेळी भाषणे झाली. अन्न औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त सुकुमार चौगुले यांनी व्यापाऱयांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच यासंदर्भातील कायद्याची माहिती दिली.

गूळ तपासणीसाठी प्रयोगशाळा

बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी सांगलीत हळदीप्रमाणे गूळ तपासणीसाठीही लवकरच प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली. शासनाला यासाठी जागाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादकांना साखर मिसळण्याची शिकवण व्यापाऱयांनीच दिल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. व्यापारी, अडते, यांनी कायद्यानुसारच व्यापार करण्याची गरज व्यक्त करतानाच बाजार समिती व्यापाऱयांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, कायम व्यापाऱयांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. मेळाव्यास पुणे, नगर, सोलापूर, अकलूज, मुंबई यांच्यासह राज्यभरातील गूळ व्यापारी, अडते उपस्थित होते.

गूळ व्यापारी परिषदेतील ठराव

– गूळ भेसळीसाठी व्यापाऱयांवर नव्हे तर उत्पादकांवर गुन्हे दाखल करा

– एफडीएने घेतलेले गुळाचे नमुने तपासणीसाठी जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सुरू करा

– व्यापाऱयांकडील शेतीमालात भेसळ सापडल्यास दहा दिवसात न्यायालयापुढे अर्ज करण्याची मुभा द्यावी

– मिठाई, चॉकलेटसारख्या फुडमध्ये साध्या रंगाचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गूळ उत्पादकांनाही असा रंग वापरण्याची परवानगी द्यावी

– उत्पादकांमध्ये एफडीएने जागृती केली पाहिजे

Related Stories

सांगली : माजी नगराध्यक्ष ॲड. सुधीर पिसे यांचे निधन

Abhijeet Shinde

सांगली : संभाव्यसंभाव्य धोका ओळखा; वेळीच स्थलांतर करा

Abhijeet Shinde

सांगली : शरीरातील काही भागात संसर्ग झाल्याने सायाळाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली शहरातील काळ्या खणीचे भाग्य उघडले

Abhijeet Shinde

म.फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत सेवा मिळणे आवश्यक – ना.टोपे

Abhijeet Shinde

शिराळा तालुक्यातील तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरड्याचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!