तरुण भारत

पवारांच्या बेईनामी संपत्तीमध्ये नातेवाईकही पार्टनर

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप : आरोप खोटा सिद्ध करून दाखवण्याचे पवार कुटुंबीयांना आवाहन

प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या नातेवाईकांच्या घरी आणि कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. ही मालमत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे. बेहिशेबी मालमत्ता संदर्भातील पुरावे माझ्याकडे असून हे पुरावे मी प्राप्तीकर विभाग, ईडी आणि सहकार मंत्रालयास देणार आहे. मी केलेले आरोप हे खोटे असल्यास खा. पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याने हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आवाहन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

  रविवारी सोमय्या सोलापूर दौऱयावर होते. कार्यकर्त्यांबरोबर भेटीगाठी, विकासकामांचे पूजन, कार्यकर्त्यांशी संवाद सांधल्यानंतर शांतीसागर मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी पवार कुटुंबीय आणि ठाकरे सरकारावर हल्ला चढवला.

   प्राप्तीकर विभाग 7 ऑक्टोबरपासून देशामध्ये विविध ठिकाणी छापा टाकत असून या छाप्यामध्ये प्राप्तीकर विभागास 184 कोटींची बेईनामी मालमत्ता आढळून आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर खा. पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्राप्तीकर विभागाचे छापे टाकण्यात येत असल्याचे म्हटले होते.

   खा. पवार यांच्या वक्तव्यानंतर सोमय्या यांनी पवार कुटुंबीयावर टीका केली. प्राप्तीकर विभागाने मुंबई, भोपाळ, दिल्ली, पुणे, बारामती या ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटींची सापडलेली बेहिशेबी मालमत्ता ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची आहे. बेईनामी संपत्ती गोळा करून उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची फसवणूक केली आहे. आ. अजित पवार यांनी जमा केलेली बेईनामी प्रॉपटी ही राष्ट्रवादी प्रमुख खा. शरद पवार यांना मान्य आहे का असा सवालही सोमय्या यांनी केला.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयाकडे असलेल्या जरंडेश्वर कारखान्यापासून बेईनामी असलेल्या मालमत्तेसंदर्भात माझ्याकडे पुरावे असून हे पुरावे मी प्राप्तीकर विभाग, ईडी आणि सहकार मंत्रालयाकडे पाठवणार आहे. मी करीत असलेला आरोप खोटा असल्यास पवार कुटुंबीयातील कोणीही हे सिद्ध करून दाखवण्याचे आवाहनही यावेळी सोमय्या यांनी दिले.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार भारत बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मुख्यमंत्री ठाकरे हे भ्रष्टाचारयुक्त सरकारकडे वाटचाल करीत आहेत. ठाकरे सरकारने गेल्या 23 महिन्यांमध्ये 24 घोटाळे केले आहेत. मेडिकल इमरजन्सीच्या नावावर राज्य अधिकाऱयांच्या हातामध्ये देण्याचे काम होत आहे. मी घोटाळ्यावर बोलत असताना सरकार मात्र यावर बोलत नाही. पोलिसांचे काम हे घोटाळे उघड करण्याचे आहे, पण या सरकारमधील पोलीस सुपारी घेत आहेत, पोलीस आयुक्त गायब होत आहेत, राज्याचे गृहमंत्री फरार होत आहेत.

  अशा या सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा हा जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही यावेळी खा. सोमय्या यांनी सांगितले. यावेळी आ. विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उप†िस्थत होते.

…………………………….

चौकट

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न

किरीट सोमय्या यांनी सोलापूर दौऱयामध्ये पत्रकार परिषद घेऊन खा. पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कुटुंबीयांवर टीका केली. पवार कुटुंबीयांवर टीका केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी होटगी रोडवरील महिला हॉस्पिटलसमोर सोमय्या यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा ताफा न थांबताच तसाच वेगाने पुढे निघून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोमय्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. यावेळी ज्योतीबा गुंड, अभिजित पाटील, सुरज मिरगे, नागेश कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उप†िस्थत होते.

Related Stories

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Shinde

सोलापूर : विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरला 25 लाखाचा पहिला हप्ता जमा

Abhijeet Shinde

बार्शी तालुक्यातील पानगाव येथील जवान सुनील काळे शहीद

Abhijeet Shinde

सोलापूर : प्रहार’च्या कार्यकर्त्यांकडून महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

Abhijeet Shinde

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन

Abhijeet Shinde

महामंडळासाठी स्थानिक नेत्यांमध्ये चुरस

prashant_c
error: Content is protected !!